Homeताज्या बातम्या११ वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस असरल्ली पोलिसांनी केले जेरबंद

११ वर्षांपासून फरार असलेल्या नक्षल समर्थक आरोपीस असरल्ली पोलिसांनी केले जेरबंद

सिरोंचा (प्रतिनिधि जाबिर खान): दिनांक 17/06/2026 रोजी पोलीस स्टेशन असरल्लीच्या पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, मागील अनेक वर्षांपासून फरार असलेला आरोपी *बापू व्यंकटी जनगम, रा. नडीकुडा* हा आपल्या मुलाबाळांना भेटण्यासाठी गावात आला आहे. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ नियोजन करून नडीकुडा गावास घेराव घातला व शोधमोहीम राबविली. दरम्यान आरोपी हा नडीकुडा येथील शेतशिवार परिसरात आढळून आला. पोलिसांनी शिताफीने कारवाई करून त्यास ताब्यात घेऊन अटक केली.

सदर आरोपीविरुद्ध *मा. सत्र न्यायालय, अहेरी येथील फौजदारी मामला क्र. 01/2023 अंतर्गत कलम 307, 34 भा.दं.वि.* तसेच *मा. प्रथम श्रेणी न्यायालय, सिरोंचा येथील फौजदारी मामला क्र. 05/2026 अंतर्गत कलम 307, 353, 379, 143, 147, 148 भा.दं.वि.*अन्वये गैरजामीनपात्र अटक वॉरंट प्रलंबित होते.

याशिवाय आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन असरल्ली येथे गुन्हा क्र. 06/2015 कलम 302, 34 भा.दं.वि. ,अप क्र.03/2015 कलम 353,337,338,34 IPC,अप क्र.
13/2011 कलम 353,332,427,143,147,149 IPC,अप क्र
42/2011 कलम 307,353,379,427,143,147,149 IPC अप क्र
10/2007 कलम 304,34 IPC असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हा क्र. 06/2015 मध्ये आरोपी हा मागील सुमारे 11 वर्षांपासून फरार होता. त्याच गुन्ह्यातील सहआरोपीस मा. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.

सदर आरोपीचे नाव जी.आर.डी. (ग्राम रक्षक दल) यादीमध्ये समाविष्ट असून तो नक्षलवाद्यांना मदत करणाऱ्या जनमिलिशिया संघटनेशी संबंधित असल्याची नोंद आहे. आरोपी दीर्घकाळ पोलिसांना चकवा देत फरार राहत असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी सातत्याने विशेष मोहिमा राबविण्यात येत होत्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून न्यायालयीन आदेशान्वये त्यास चंद्रपूर केंद्रीय कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

दीर्घकाळ फरार असलेल्या व विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये वांछित असलेल्या आरोपीस अटक करण्यात असरल्ली पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे नक्षलविरोधी अभियानास बळ मिळाले आहे. फरार आरोपींचा शोध घेणे व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी पोलीस विभागामार्फत विशेष कारवाया यापुढेही सुरू राहतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!