Homeताज्या बातम्यादबावाला न झुकणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सत्कार

दबावाला न झुकणाऱ्या खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्स क्लबतर्फे विशेष सत्कार

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर कोणत्याही दबावाला अथवा प्रलोभनांना बळी न पडता आपल्या तत्त्वांशी आणि जनतेशी एकनिष्ठ राहिलेल्या खासदार राजाभाऊ वाजे यांचा लायन्स क्लबच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. खासदार जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात लायन्स क्लबचे पदाधिकारी जितेंद्र जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार वाजे यांच्यावर विविध प्रकारचे राजकीय दबाव आणले जात असल्याची चर्चा होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत आपल्या भूमिकेवर ठाम राहून त्यांनी स्वाभिमान, निष्ठा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी कायम राखली. त्यांच्या या खंबीर भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्याच भावनेतून लायन्स क्लबने त्यांचा सन्मान केला.
यावेळी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार वाजे यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या आश्वासनाबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली. लायन्स हॉल व परिसराच्या सुशोभीकरणासाठी खासदार निधीतून भरीव मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून, त्यामुळे क्लबच्या सामाजिक व जनहिताच्या उपक्रमांना अधिक चालना मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सत्कार समारंभास डॉ. भरत गारे, डॉ. विजय लोहारकर, अपर्णा क्षत्रीय, संजय सानप, मनीष गुजराती, सोपान परदेशी, अतुल अग्रवाल यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले, “सर्वसामान्य जनतेने आणि सुजाण नागरिकांनी दिलेला विश्वास हीच माझी खरी ताकद आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदारसंघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी मी कायम कटिबद्ध राहीन. तसेच लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांना बळ देण्यासाठी दिलेला शब्दही लवकरच पूर्ण करेन.”
या सत्कारामुळे खासदार वाजे यांच्या ठाम आणि स्वाभिमानी नेतृत्वाविषयी जनमानसात असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित...

error: Content is protected !!