जळगाव:प्रतिनिधी(विनोद पवार)
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे मुंबई परिसर विभागाचे समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष श्री.अरुण बोरोले यांचे हस्ते एस.बी.फिरके विद्यालय,तीन हात नाका,ठाणे (प) येथे रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली.सुरुवातीस श्री.अरुण बोरोले यांनी समुपदेशन व समस्या निवारण केंद्राची संकल्पना आणि उद्दिष्टे सांगितली. महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे हे चौथे समुपदेशन केंद्र आहे.प्रत्येक विभागात आपण एक केंद्र स्थापित केले असून गरजेप्रमाणे त्यांची संख्या व व्याप्ती वाढवता येईल असे ते म्हणाले.
श्री.विकास वारके यांनी महासंघाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करून त्याची माहिती व उपयोग सांगीतले.
श्री. के.जी.भोळे यांनी मुंबई परिसरात समाज बांधवांना येणार्या समस्या,विवाह आधी आणि विवाह पश्चात् येणार्या समस्यांचा उहापोह केला.प्रत्येकाच्या जीवनात त्याच्या आचरण आणि विचार शक्तीवर,वागण्यावर खोलवर प्रभाव करणारे घटक म्हणजे कुटुंब,शिक्षण आणि समाज.या तीनही गोष्टींशी निगडीत हे समुपदेशन केंद्र आहे.या समुपदेशन समितीतील निरनिराळ्या विषयाचे, गतीचे,कुशल आणि योग्य अश्या व्यक्ती समाज बांधवांना नेहमी मदत करण्यास तत्पर असतील अशी ग्वाही दिली.ही समिती उत्कृष्टपणे कार्य करेल व त्यामुळे भावी पिढीला पुरोगामी,सुधारित,व सुयोग्य समाजाचे फायदे मिळतील असे सांगीतले.
खान्देश सेना प्रमुख श्री.सुहासदादा बोंडे यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची गरज स्पष्ट करून कार्यकर्ता म्हणून आपण सोबत आहोत असे आश्वासन दिले.
महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार श्री.पुरुषोत्तम पिंपळे,पुणे यांनी अनुभव कथन करून समुपदेशनाची दिशा स्पष्ट केली.
त्यानंतर डॉ.मिलिंद पाटील,(कोषाध्यक्ष) महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघ यांनी सभेस मार्गदर्शन केले.त्यांच्या संकल्पनेनुसार समाज टिकायला हवा यासाठी समुपदेशनातून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.समाजाने संकटातील समाजबांधवांसाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने दातृत्वाची भावना जोपासणे गरजेचे आहे या बाबी समाजाच्या उन्नती व एकीकरणाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहेत,म्हणून सर्व प्रकारच्या सामाजिक समस्या आणि कौटुंबिक कलह समस्या यावर समुपदेशनाच्या कामातून योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यास समाज टिकून राहण्यासाठी नक्कीच मदत होईल असे त्यांनी सांगितले.
श्री.दिव्यकांत नारखेडे यांनी समितीची रचना व रूपरेषा सांगितली तसेच कार्यक्रमाचे संचलन केले.त्यानंतर इतर उपस्थित मान्यवरांना आपले विचार प्रगट करण्याची संधी देण्यात आली.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.यात प्रामुख्याने श्री.उज्वल चौधरी,श्री.विकास भंगाळे,उद्योजक मेघश्याम चौधरी,समुपदेशक सौं.वीणा चौधरी,श्री.विकास नेहेते व समुपदेशक सौं.तन्वी सिंगनुरकर,श्री.राजेश ढाके,श्री.प्रकाश चौधरी,निवृत्त महापालिका अधिकारी वारके, शैलेश बेंडाळे- निवृत्त कार्यकारी अभियंता ठाणे महानगरपालिका,श्री.दिलीप चौधरी-भातृमंडल पुणे,प्रा.डॉ.किरण चौधरी,श्रीमती.लीलाताई गाजरे,श्री.राजेंद्र फालक,श्री.भूषण चौधरी,श्री.आशिष चौधरी,श्री.हेमंत चौधरी,सौं.मनीषा महाजन,सौं.दीपा वारके,श्रीमती.चारुलता पाटील,सौं.रोहिणी सरोदे,श्री.एम.एच.कोल्हे सर,आणि अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
याप्रसंगी श्री.नितीन जावळे,श्री.पुरुषोत्तम पिंपळे,सौं.स्मिता चौधरी,सौं.कामिनी जावळे तसेच मुंबई परिसरातील लेवा पाटीदार समाज मंडळाचे सन्मा.पदाधिकारी आणि इतर सन्मा.मान्यवर समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या.
श्री.दिव्यकांत नारखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
श्री.निळकंठ चौधरी यांनी आपले विचार मांडून नंतर आभार प्रदर्शन केले.
महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे मुंबई परिसर विभागाचे समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन.
RELATED ARTICLES
- Advertisment -
दिल्लीत हिवाळ्यात ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण कायमस्वरूपी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? सोप्या...
EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार EPFO 3.0 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असून...
ST Bus : हिंगोली भरदिवसा राडा! तिकीट मागितले म्हणून एसटी वाहकाला बेदम मारहाण, कर्मचाऱ्यांचे...
हिंगोली: मध्यवर्ती बस स्थानकावर एका एसटी बस वाहकाला (कंडक्टर) प्रवाशांच्या टोळक्याने तिकिटाच्या कारणावरून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संजय अडकिने असे या...
IPL: सीएसकेमध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? समोर आली मोठी अपडेट.
हार्दिक पांड्या:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात सामील होणार का, याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या संघात सामील होण्याबाबतच्या...
शाळेसमोर कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरूआहे,खेळ वाळूज जिल्हा परिषद शाळेबाहेर दुर्गंधीचा विळखा, तातडीने स्वच्छतेची...
वाळूज:(प्रतिनिधी)पांडुरंग गायकवाड
वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे.
याच परिसरात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत...