Homeताज्या बातम्यादुधातील भेसळ रोखण्यासाठी FDA चे मोठे पाऊल; तुकाराम मुंडेंची नवी नियमावली, उत्पादक-विक्रेत्यांवर...

दुधातील भेसळ रोखण्यासाठी FDA चे मोठे पाऊल; तुकाराम मुंडेंची नवी नियमावली, उत्पादक-विक्रेत्यांवर राहणार कडक नजर

मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी राज्यभर भेसळ आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. हॉटेल्स, खाद्यपदार्थ विक्रेते आणि भेसळीचा संशय असलेल्या ठिकाणी सातत्याने कारवाई केल्यानंतर आता त्यांनी दुधातील भेसळीवर लक्ष केंद्रित केले आहे.

यापूर्वी महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा, गोवा आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातही मुंडे यांनी कठोर भूमिका घेतली होती. अशा प्रकरणांमध्ये आरोपींवर मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

आता ग्राहकांना शुद्ध आणि दर्जेदार दूध मिळावे यासाठी FDA कडून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. “ग्राहकांच्या ताटापर्यंत भेसळमुक्त दूध पोहोचणे हा त्यांचा हक्क आहे,” असे सांगत मुंडे यांनी दूध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांसाठी नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांची विशेष बैठक घेण्यात आली असून, दूध उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतच्या संपूर्ण पुरवठा साखळीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या घटकांवर लागू होणार नवे नियम

  • दूध संकलन केंद्रे
  • दूध शीतकरण केंद्रे
  • दुग्ध प्रक्रिया युनिट्स
  • दूध उत्पादक
  • वितरक
  • वाहतूकदार
  • घाऊक विक्रेते
  • किरकोळ विक्रेते

याशिवाय पनीर, खवा, तूप, दही, चीज आणि दूध पावडर यांसारख्या सर्व दुग्धजन्य उत्पादनांनाही नव्या नियमांच्या कक्षेत आणण्यात येणार आहे.

FDA च्या या निर्णयामुळे दुधात भेसळ करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील ग्राहकांना शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे. भेसळीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी FDA लवकरच नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय निकमची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड.

0
शिरपूर, धुळे :(प्रतिनिधी)तुषार शेटे कर्मवीर सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचा प्रशिक्षणार्थी धनंजय शामकांत निकम (वय २१) याची इंडियन आर्मीच्या टेक्निकल विभागात निवड झाल्याने परिसरात आनंदाचे...

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो निवृत्त होणार! बहीण कटिया एविरोने केला खुलासा

0
फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 वर्ल्डकपनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती? जागतिक फुटबॉलमधील दिग्गज खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबाबत मोठी माहिती समोर आली आहे....

IND vs ENG: दुसऱ्या टी-20पूर्वी जाणून घ्या भारत-इंग्लंड लढतीतील मोठे फलंदाजी विक्रम; बटलर अव्वल,...

0
IND vs ENG: दुसऱ्या टी-20पूर्वी जाणून घ्या भारत-इंग्लंड लढतीतील मोठे फलंदाजी विक्रम; बटलर अव्वल, कोहली-रोहितही यादीत मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20...

गोदाम फोडून २.८८ लाखांच्या १४४ इंडक्शन शेगड्या लंपास; अवघ्या काही दिवसांत आरोपी जेरबंद, MIDC...

0
प्रतिनिधी :(वाळूज महानगर) पांडुरंग गायकवाड एमआयडीसी वाळूज पोलिसांनी साजापूर शिवारातील गोदाम फोडून चोरी करण्यात आलेल्या २ लाख ८८ हजार रुपये किमतीच्या १४४ इंडक्शन शेगड्यांचा गुन्हा...

CPR देताना सावध! चुकीच्या पद्धतीने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात महिलेच्या दोन बरगड्या तुटल्या; तज्ज्ञांनी सांगितले...

0
मुरैना : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्टच्या वाढत्या घटनांमुळे 'सीपीआर' (Cardiopulmonary Resuscitation) या जीव वाचवणाऱ्या तंत्राची जागरूकता वाढत आहे. मात्र, योग्य माहिती आणि प्रशिक्षणाशिवाय...

error: Content is protected !!