देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज दिनांक 11 जुलै 2026 रोजी संत चोखामेळा महाराज यांच्या मंदिराजवळ असलेल्या सभामंडपामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मनोज भाऊ कायंदे साहेब हे होते. प्रमुख अतिथी गणामध्ये माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब डॉक्टर गणेश जी मांटे, प्रकाश भाऊ गीते, दादारावजी खरडे, गजानन पवार, दीपक भाऊ बोरकर, सरपंच मंदाताई बोंद्रे सरपंच पती विष्णूजी बोंद्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जांभळीच्या रोपट्याची लागवड संत चोखामेळा महाराज यांच्या जन्मस्थळाजवळ करण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सपत्नीक सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

माननीय आमदार मनोज भाऊ कायंदे यांना पुढील कार्यक्रमाला जायचे असल्यामुळे त्यांनी आपले अध्यक्ष भाषण प्रथम केले त्यांनी सेवानिवृत्त शिक्षक श्री वाघ सर, श्री केवट सर, श्री पाकळसर या शिक्षकांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. देऊळगाव राजा पंचायत समिती मध्ये चांगले काम करणारे शिक्षक लाभलेले आहेत असे त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितले . माननीय माजी आमदार तोतारामजी कायंदे साहेब यांनी पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यामध्ये झालेला फरक आपल्या भाषणामध्ये विशद केला .त्यामध्ये त्यांनी पूर्वीचे शिक्षक शिस्त लावण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षा करत असे. पूर्वीची म्हण त्यांनी विशद केली त्यामध्ये “छडी लागे छम छम विद्या येई घम घम” आताच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा करता येत नाही त्यांना बंधने आली त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीचा अभाव जाणवत आहे असे त्यांनी आपल्या भाषणामधील सांगितले.

डॉक्टर गणेश जी मांटे यांनी देशाचे सशक्त नागरिक घडविण्याचे काम शिक्षकांच्या हाती आहे शिक्षक हे देशाच्या विकासाचे आधारस्तंभ घडवतात असे सांगितले त्यानंतर दीपक जी बोरकर, दादारावजी खरडे, गजानन पवार, साहेब, विस्तार अधिकारी मुसदवाले साहेब , राजेश नागरे, भास्करराव शिंगणे सर,बबनराव नागरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री वाघ सर श्री केवट सर यांनी केलेल्या कार्याचा व सेवेचा लेखाजोखा आपल्या सत्काराला तर देताना मांडला. कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षकांच्या धर्मपत्नी उपस्थित होत्या.सदर
सेवानिवृत्त शिक्षकांचा मेव्हणा राजा केंद्र अंतर्गत शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती मेहुणा राजा यांच्या संयुक्त विद्यमाने आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .सदर कार्यक्रमासाठी केंद्रांतर्गत सर्व शिक्षक शिक्षिका केंद्रप्रमुख तसेच तालुक्यातील केंद्रप्रमुख गावकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप डोईफोडे यांनी केले. अशाप्रकारे मोठ्या उत्साहात सेवानिवृत्त शिक्षकांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संत चोखा महाराज यांच्या पावन नगरीत संपन्न झाला.






















