Homeताज्या बातम्याप्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड)

दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर चावडी, साठेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग अभियानाला तब्बल ७०० नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

या अभियानास नगराध्यक्ष कु. दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते जीवराज बापू पवार, साधनाताई सोनाने, विशाल ओहोळ, माजी नगरसेवक उत्तमराव सोनवणे तसेच साठेनगर परिसरातील विनायक मोरे, संजय मोरे, उपेश तुपसौदर्य, सुरेश तुपसौदर्य, सोमनाथ आगलावे, अनिल कांबळे, नितीन तुपसौदर्य, धीरज दिवटे, अमित मोरे, साहिल खंडाळे, संदीप इमानदार आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मॅपिंग प्रक्रियेचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत मतदार नोंदी अचूक ठेवण्याचे महत्त्वही स्पष्ट केले.

यावेळी BLO अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करून फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुलभ केली. प्रभाग क्रमांक ६ मधील युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रभावी नियोजन करून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग सुनिश्चित केला, त्यामुळे अभियान यशस्वीरीत्या पार पडले.

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद ही लोकशाही बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, भविष्यातही नागरिकांनी अशा उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी केले. तसेच अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

शिक्षकांचा वृक्षारोपण करून सेवापूर्ती सोहळा संपन्न.

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज...

भाजप ओबीसी मोर्चातर्फ़े शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ येथे SIRअभियान

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे):प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा व शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील प्रभाग ८ येथे SIR अभियानाबाबत विशेष बैठक व मार्गदर्शन शिबिर प्रदेश...

error: Content is protected !!