Homeताज्या बातम्याझिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

टाइम्स ऑफ महाराष्ट्र
सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान

सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा अभिनव उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिरोंचा वन विभागाचे उपवनसंरक्षक (DCF) नवकिशोर रेड्डी व सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अक्षय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली, झिंगानूर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत नरेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना सीडबॉल तयार करण्याची पद्धत, त्यामागील संकल्पना आणि पर्यावरण संवर्धनातील त्याचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगण्यात आले. माती, शेणखत आणि स्थानिक फळझाडांच्या बियांचा वापर करून तयार करण्यात येणारे सीडबॉल दुर्गम व पडीक भागात सहजपणे वृक्षलागवड करण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत खैरनार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “वृक्षलागवड ही केवळ मोहीम नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन केले.

या उपक्रमासाठी वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि वनमजुरांनी स्थानिक फळझाडांच्या बिया गोळा करून मोठ्या प्रमाणात सीडबॉल तयार केले होते. त्यानंतर आश्रमशाळेजवळील सुमारे दोन ते तीन हेक्टर पडीक जागेवर विद्यार्थ्यांच्या सहभागातून हे सीडबॉल प्रसारित करण्यात आले. आगामी पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणात झाडांची वाढ होईल, असा विश्वास वन विभागाने व्यक्त केला.
कार्यक्रमाला समाजसेवक रामचंद्र कुमरी, स्थानिक ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच वन विभागाचे अधिकारी, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि वनमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते. वन विभाग, शाळा आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात आलेल्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

प्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर चावडी, साठेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग अभियानाला तब्बल ७०० नागरिकांनी...

शिक्षकांचा वृक्षारोपण करून सेवापूर्ती सोहळा संपन्न.

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज...

भाजप ओबीसी मोर्चातर्फ़े शामकांत ईशी यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ८ येथे SIRअभियान

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे):प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा व शिरपूर वरवाडे नगर परिषद येथील प्रभाग ८ येथे SIR अभियानाबाबत विशेष बैठक व मार्गदर्शन शिबिर प्रदेश...

error: Content is protected !!