(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला त्यांनी आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील एक संस्मरणीय व प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाबद्दल व विश्वासाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांची कार्यपद्धती प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानभवनातील अनुभवातून समाजहितासाठी अधिक जोमाने आणि जबाबदारीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगत, अहेरीसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार सौ. शाहीन हकीम यांनी व्यक्त केला.






















