Homeताज्या बातम्या१ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त बीड येथे ' छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

१ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त बीड येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ व राजस्व अभियानाचे आयोजन

गेवराई तालुकाछ(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त बीड येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ व राजस्व अभियानाचे आयोजन : नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सेवांचा लाभ घ्यावा – प्रशासन

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत दरवर्षी 1 ऑगस्ट हा ‘ महसूल दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येतो . महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख , पारदर्शक , गतिमान व तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने यावर्षीही राज्यभर विविध उपक्रम राबविण्यात येत असून , महसूल दिनाचे औचित्य साधून ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ तसेच ‘ राजस्व अभियान ‘ राबविण्यात येत आहे . या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित नागरिकांच्या विविध समस्या , प्रलंबित प्रकरणे , महसुली सेवा व शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे . नागरिकांना शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत , त्यांच्या प्रलंबित कामांचा तातडीने निपटारा व्हावा आणि शासनाच्या सेवा सुलभ व वेळेत उपलब्ध व्हाव्यात , हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे .
शनिवार दि 01 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता , अंबिका लॉन्स , पांगरी रोड , बीड येथे ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर व महसूल दिन – 2026 ‘ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा ‘ हा महत्त्वपूर्ण भाग असून , महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्यापक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे .
कार्यक्रमास पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे , बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर राहणार असून , योगेश क्षीरसागर , नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे . तसेच जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रेहमान , पोलीस अधीक्षक नवनीत काँवत , परीविक्षाधीन आय ए एस दिव्यांक गुप्ता , अपर जिल्हाधिकारी हरिष धार्मिक , अपर जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे सोनवणे , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी , विविध विभागांचे प्रमुख अधिकारी , राजपत्रित अधिकारी , महसूल कर्मचारी , तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थित राहणार आहेत .
शासनाचे विविध विभाग तसेच महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांना वारंवार कार्यालयात जावे लागू नये , विविध दाखले व प्रमाणपत्रे वेळेत मिळावीत , जमिनीसंबंधी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा व्हावा , महसुली अभिलेखांमधील त्रुटी दूर व्हाव्यात आणि नागरिकांना शासनाच्या डिजिटल सेवांचा अधिकाधिक लाभ मिळावा , या उद्देशाने हे विशेष समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे . प्रशासन अधिक पारदर्शक , उत्तरदायी आणि लोकाभिमुख करण्यासाठी हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे .
या विशेष शिबिरामध्ये सातबारा उताऱ्यावरील चुका दुरुस्ती , फेरफार नोंदी , वारस नोंदी , ई – मोजणी संदर्भातील मार्गदर्शन , शेतकरी प्रमाणपत्र , महिला शेतकरी प्रमाणपत्र , स्वामित्व सनद , विविध महसुली दाखले , ई – शिधापत्रिका , कृषिकर्जासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन , जमिनीसंबंधी प्रलंबित प्रकरणे , शासकीय जमिनीवरील अतिक्रमणासंबंधी बाबी , महसूल विभागाच्या विविध ऑनलाइन सेवा , तसेच शासनाच्या विविध विभागाशी संबंधित इतर विविध प्रकरणांवर जागेवर कार्यवाही व मार्गदर्शन करण्यात येणार आहे . नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी विविध शाखांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार असून , आवश्यक त्या अर्जांचा स्वीकार करून तातडीने कार्यवाहीही करण्यात येणार आहे .
राजस्व अभियान अंतर्गत जिल्हाभर महसूल प्रशासन अधिक परिणामकारक करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे . गावपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत प्रलंबित महसुली प्रकरणांचा आढावा घेऊन त्यांचा वेळेत निपटारा करणे , महसुली अभिलेख अद्ययावत करणे , सातबारा व फेरफार नोंदी अचूक करणे , डिजिटल सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविणे , महसूल विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करणे , यावर विशेष भर देण्यात येणार आहे . या अभियानामुळे महसूल विभाग आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सुलभ होऊन सेवा वितरणाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे .
महसूल दिन हा केवळ महसूल विभागाचा वर्धापनदिन नसून , शासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ करण्याचा दिवस आहे . उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव , महसूल प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा , लोकाभिमुख सेवा वितरणाचा संकल्प आणि नागरिकांना दर्जेदार , पारदर्शक व जलद सेवा उपलब्ध करून देण्याच्या बांधिलकीची पुनर्प्रतिज्ञा या माध्यमातून व्यक्त केली जाणार आहे . त्यामुळे महसूल दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ‘ व ‘ राजस्व अभियान ‘ हे बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त आणि लाभदायी ठरणार आहे .
तरी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिक , शेतकरी , महिला , विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , व्यापारी तसेच महसूल विभागाशी संबंधित कोणतेही काम प्रलंबित असलेल्या नागरिकांनी शनिवार , 01 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता , अंबिका लॉन्स , पांगरी रोड , बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर व महसूल दिन – 2026 ‘ या जिल्हास्तरीय कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध महसुली सेवांचा लाभ घ्यावा , असे आवाहन उपविभागीय अधिकारी कविता जाधव तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके तसेच अधिकारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी केले आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!