शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक संस्थेच्या क्रीडा विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाचे औचित्य साधून क्रीडा विभागातील खेळाडूंना गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थित खेळाडू, शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले.क्रीडा क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या गुणवत्तेला वाव देणे आणि विविध क्रीडा प्रकारांमध्ये त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने क्रीडा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गणवेश वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी संस्थेचे क्रीडा विभाग विशेष सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. राकेश बोरसे, विभाग प्रमुख प्रा. राधेश्याम पाटील, जीनेश पराडके, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक श्री. विजेंद्र जाधव, नूर तेली, हेमंत शिरसाठ, कल्पेश माळी, सागर कोळी, भरत मराठे, प्रज्वल महाले, विकास शिंदे, भरत वाणी आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाबासो रोहित रंधे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कार्याला उजाळा दिला. संस्थेच्या प्रगतीसोबतच खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन व सहकार्य यापुढेही मिळत राहावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.खेळाडूंनीही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. गणवेश वाटप व अल्पोपहारामुळे कार्यक्रमाला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.कार्यक्रमाच्या निमित्ताने क्रीडा विभागातील शिक्षक, प्रशिक्षक, खेळाडू व उपस्थित मान्यवरांनी बाबासो रोहित रंधे यांना निरोगी, यशस्वी व दीर्घायुषी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
























