Homeताज्या बातम्यापुणे : वाहनचोरी करणारा आरोपी येरवडा तपास पथक कडून जेरबंद

पुणे : वाहनचोरी करणारा आरोपी येरवडा तपास पथक कडून जेरबंद

पुणे : शहरातील वाहनचोरीच्या वाढत्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग आणि विशेष मोहिम राबवण्याचे निर्देश दिले होते. येरवडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनचोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत आरोपीकडून ३०,००० रुपये किमतीची अॅक्टीव्हा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांनी विशेष सूचनांच्या अनुषंगाने तपास मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाला आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलीस कर्मचारी तुषार खराडे, बालाजी सोगे, भीमराव कांबळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रामनगर परिसरातून चोरलेली पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा दुचाकी विक्रीसाठी येरवड्यातील मेंटल ग्राऊंड येथे आणली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना अहवाल देऊन कारवाईचे आदेश घेण्यात आले.

तपास पथकाने तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली असता, एका इसमास पांढऱ्या रंगाची अॅक्टीव्हा मोटारसायकल घेऊन थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, तपास पथकाने त्याचा पाठलाग करत अतिशय शिताफीने त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने स्वतःचे नाव सुरज संतोष माने (वय २४, रा. रामनगर, येरवडा, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडील वाहनाची अधिक चौकशी केली असता, येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२७/२०२५ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईत आरोपीकडून ३०,००० रुपये किमतीची अॅक्टीव्हा मोटारसायकल जप्त करण्यात आली. यामुळे वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह-आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, स्वाती खेडकर तसेच तपास पथक प्रमुख सपोनि सुनिल सोळुंके, प्रदीप सुर्वे आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, विशाल निलख, अमोल गायकवाड, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे, नटराज सुतार, भीमराव कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, चोरीस गेलेल्या वाहनांची तक्रार तातडीने नोंदवा आणि संशयास्पद व्यक्तींबाबत पोलिसांना माहिती द्या, जेणेकरून अशा गुन्ह्यांना आळा घालता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंद्रपूरला नवे नेतृत्व: आयुष नोेपानी यांची जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती

0
चंद्रपूर ( निलेश ठाकरे - महाराष्ट्र हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र) :  जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेला नवे बळ मिळणार असून आयुष नोेपानी यांची जिल्हा...

जिल्ह्यात आजपासून जनगणना सुरू; चुकीची माहिती दिल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :  जळगाव जिल्ह्यात आजपासून जनगणना प्रक्रियेला अधिकृतपणे सुरुवात झाली असून, या महत्त्वाच्या उपक्रमासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाभरात सुमारे ७...

डॉ. दीपक फाटक यांच्या कर्तृत्वाने रुग्ण मृत्यूच्या दाढेतून सुखरूप.

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील अंबू नाईक तांड्या (खांडवी) येथील आदिवासी पारधी समाजातील रहिवासी श्री. भद्री भोसले (वय ४०) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे...

गढी ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात; ध्वजारोहणासह मान्यवरांची उपस्थिती

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील गढी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माजी सरपंच तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ....

सुशीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती जल्लोषात; सामाजिक ऐक्याचा संदेश

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : तालुक्यातील सुशी गावात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात...

error: Content is protected !!