Homeताज्या बातम्यागेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

गेवराईत नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती; शिक्षण क्षेत्रात नव्या उमेदीची अपेक्षा

गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : 
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारी महत्त्वाची घडामोड घडली असून, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भीमाशंकर नांदुरकर यांची गट शिक्षणाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बीड जिल्हा परिषदेने २५ एप्रिल रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले. त्यानंतर नांदुरकर यांनी मावळते गट शिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील यांच्याकडून पदभार स्वीकारला.

मुळचे बीड येथील रहिवासी असलेले नांदुरकर यांना शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी वडवणी, अंबाजोगाई आणि परळी येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. शांत, संयमी आणि मेहनती अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्या नियुक्तीमुळे गेवराई तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या तालुक्यात ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुखांची संख्या अत्यल्प असताना शिक्षण व्यवस्थापनाची मोठी जबाबदारी नांदुरकर यांच्यावर येणार आहे. उपलब्ध मनुष्यबळाच्या मर्यादांमध्ये शिक्षण विभाग प्रभावीपणे चालवणे, शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना देणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असणार आहे.

याशिवाय, काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दीर्घकाळ गट शिक्षण कार्यालयात कार्यरत असून त्यांना त्यांच्या मूळ कार्यस्थळी परत पाठवण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे. प्रशासनातील शिस्त आणि कार्यक्षमतेसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

गेवराई तालुक्याला अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील, अशी आशा व्यक्त होत आहे. अनेक शिक्षकांनी नांदुरकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्यकाळात तालुक्याच्या शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अतिवृष्टी अनुदान १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा; अन्यथा कांग नदीत जलसमाधी आंदोलनाचा इशारा

0
जामनेर तहसीलदारांना शेतकऱ्यांचे निवेदन; प्रशासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मंजूर करण्यात आलेली अतिवृष्टी अनुदानाची...

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

error: Content is protected !!