Homeताज्या बातम्यानवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची फुटलेली पाळ तातडीने दुरुस्त करा; प्रमोद चिमुरकर

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) :  ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा नवेगाव खुर्द येथील मामा तलावाची पाळ मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे फुटली होती. ही पाळ आगामी पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
जुलै २०२५ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे २८ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास या तलावाच्या मध्यभागातील पाळ अचानक फुटली होती. तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडल्याने नवेगाव खुर्द आणि मेंडकी परिसरातील शेतांमध्ये पाणी शिरले होते. यामध्ये सुमारे २५ एकरांहून अधिक क्षेत्रातील धान पीक पूर्णतः नष्ट झाले होते. शेतीसोबतच तलावातील मत्स्य व्यवसायाचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.

तलावाची पाळ फुटल्यामुळे पाणी साठवणूक होऊ शकली नाही. याचा परिणाम उर्वरित शेतकऱ्यांच्या सिंचनावर झाला असून, पाण्याअभावी अनेकांना पीक घेणे कठीण झाले होते. या घटनेला आता नऊ महिने उलटून गेले आहेत, तरीही प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले नाही.

पावसाळा तोंडावर, कामाची प्रतीक्षा
आता एप्रिल महिना संपत आला असून पावसाळा जवळ येत आहे. पुन्हा तशीच परिस्थिती ओढवू नये आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच पाळीचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आग्रही असणारे नेते प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी या कामासाठी पाठपुरावा सुरू केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशा पल्लवित झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अवघ्या दोन महिन्यांत नव्या रस्त्याची तोडफोड; PWDच्या नियोजनशून्य कारभारासह ठेकेदाराच्या कामाची चौकशीची मागणी

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवरील रुचिरा हॉटेल ते सराफ बंगला या दरम्यानचा रस्ता अवघ्या एक ते दोन महिन्यांपूर्वी पूर्ण करण्यात...

दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे संघराज गायकवाड)  दौंड शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांनी धडक कारवाई केली. सार्वजनिक शांतता व...

शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई

0
शाळांबाहेर मिनी मोबाईल विक्रीचे रॅकेट उघड; दामिनी पथकाची कारवाई विद्यार्थिनींना प्रेमाच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न; पालकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन जळगाव : प्रतिनिधी (विनोद पवार)शहरातील शाळांच्या परिसरात...

शेख मुजीब यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे बीड शहरात निषेध आंदोलन

0
आ. विजयसिंह पंडित टीम आक्रमक, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  बीड, दि.०६ (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री...

उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहीणी पवार यांच्यावरील वक्तव्याचा गेवराईत निषेध

0
राष्ट्रवादी काँग्रेसने केले तिव्र आंदोलन जाहीर निषेध गेवराई तालुका:(प्रतिनीधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि. ६ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ना....

error: Content is protected !!