Homeताज्या बातम्याराज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तातडीनं बदली; निवडणूक आयोगाचे आदेश

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची तातडीनं बदली; निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई : – विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेससह विरोधकांनी आयोगाकडे तक्रारी केल्या होत्या.

त्यानंतर आज यावर निर्णय घेत निवडणूक आयोगाने शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उद्यापर्यंत पाठवा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव यांना आयोगाने दिले आहेत.

रश्मी शुक्ला यांची कारकिर्द वादात होती. फोन टॅपिंगमुळे विरोधकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप केले होते. मुदत संपूनही रश्मी शुक्ला यांना २ वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवावं अशी मागणी सातत्याने विरोधकांकडून केली जात होती. याबाबत विरोधकांनी केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांचीही भेट घेतली होती. रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळात निष्पक्षपणे निवडणूक पार पडणार नाहीत असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले असले तरी निवडणूक प्रक्रियेत त्या सहभागी होणार नाहीत याची काळजी निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला त्याचे स्वागत आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकपदावर बसून भाजपाला पाठिंबा देणाऱ्या या अधिकारी होत्या. विरोधकांचे फोन टॅपिंग केले जात होते. निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यांना या पदावर बसवलं होते. निवडणूक आयोगाकडे आम्ही याबाबत तक्रार केली होती. झारखंड, पश्चिम बंगाल याठिकाणी महासंचालक बदलले मात्र इतका वेळ निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला का लागला हा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

संजय राऊतांनीही केले होते आरोप

केंद्रीय गृहमंत्री राज्यांमध्ये फिरून आपण कसे जिंकणार, याची तयारी करत आहेत. राज्याच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली करावी. राज्यात ज्या पद्धतीने गुंडशाही सुरू आहे त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी संजय राऊत यांनी देशाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना केली होती. सध्या घडीला पोलीस यंत्रणा राजकीय कामाला झोपली आहे एका पक्षाच्या कामाला जंपली आहे. त्यामुळे निवडणुका स्वच्छ वातावरणात होणार नाही. हा आमचा अंदाज होता तो आता खरा होताना दिसत आहे असं संजय राऊतांनी केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!