Homeताज्या बातम्यामुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली ....

मुंडेंच्या विरोधात मराठा उमेदवार, शरद पवारांनी भाकरी फिरवली ….

बीड : राज्याचे लक्ष असलेल्या परळी मतदारसंघासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाकरी फिरवत धनंजय मुंडे यांच्याविरोधात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात आलेल्या राजेसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

येथून काही ओबीसी नेते इच्छुक असतानाही पवारांनी परळीत मराठा चेहरा म्हणून देशमुखांना उमेदवारी दिली, तर माजलगावातून दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केलेल्या रमेश आडसकरांना ‘हाबाडा’ देत मोहन जगतापांना उमेदवारी जाहीर केली आहे. बीड आणि आष्टी मतदारसंघांमधून महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले असले तरी महायुतीकडून अद्यापही उमेदवार देण्यात आलेले नाहीत.

गेवराईत काका-पुतण्या लढत
गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे बदामराव पंडित आणि महायुतीकडून अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. या पंडित काका-पुतण्यात पुन्हा एकदा लढत होणार आहे. याच ठिकाणी भाजपचे विद्यमान आ. लक्ष्मण पवारही अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत.

माजलगावात आडसकर करणार बंडखोरी
भाजपचे नेते रमेश आडसकर यांनी दोन दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यांना माजलगावातून उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी मोहन जगताप यांना उमेदवारी जाहीर झाल्याने आता आडसकर बंडखोरी करण्याची दाट शक्यता आहे.

आष्टीत विद्यमान आमदार वेटिंगवरच
– आष्टीत महायुतीकडून अजित पवार गटाचे विद्यमान आ. बाळासाहेब आजबे, भाजपचे माजी आ. भीमराव धोंडे आणि सुरेश धस इच्छुक आहेत. त्यामुळे येथून उमेदवारी दिलेली नाही. अशीच परिस्थिती बीडमध्ये आहे. येथील जागेवर शिंदेसेना दावा करत असून, जिल्हाप्रमुख अनिल जगताप इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून डाॅ. योगेश क्षीरसागर इच्छुक असून, त्यांच्यासाठी धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी ताकद लावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!