Homeताज्या बातम्याअलार्ड युनिव्हर्सिटी तळागळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध ; विद्यापीठाकडून क्रीडा व ...

अलार्ड युनिव्हर्सिटी तळागळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध ; विद्यापीठाकडून क्रीडा व अन्य शिष्यवृत्तीचे वितरण ; महाराष्ट्र प्रिमियम लीगच्या कोल्हापूर टस्कर्सला सपोर्ट…

अलार्ड युनिव्हर्सिटी तळागळातील खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध ; विद्यापीठाकडून क्रीडा व  अन्य शिष्यवृत्तीचे वितरण ; महाराष्ट्र प्रिमियम लीगच्या कोल्हापूर टस्कर्सला सपोर्ट…

पुणे, दि.12 जून : तळागळातील सर्व खेळांना प्रोत्साहन आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या अलार्ड विद्यापीठाने महाराष्ट्र प्रीमियर लगीच्या कोल्हापूर टस्कर्स संघाला महाराष्ट्रात खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या सोबतच संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठीसह त्यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती पत्रांचे वाटप केले. अशी माहिती अलार्ड विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व कुलधीपती डॉ. एल.आर.यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी  डॉ. राम यादव, कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी आणि अलार्ड विद्यापीठाच्या मार्केटिंग विभागाचे संचालक पी.ए.व्ही. शेखर उपस्थित होते.
फूटबॉलमध्ये राज्यस्तरीय पदक मिळविलेल्या श्रृती माने हिला ५० टक्के  शिष्यवृत्ती आणि स्विमिंगमध्ये  राष्ट्रीय पदक विजेता कुसुम कुमावत हिला ७५ टक्के शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. त्याच बरोबर इतर विभागातील ललिता चौधरी, हर्षवर्धन वाजे, पृथ्वीराज चव्हाण, शुभम जोशी, लेफ्टनंट कर्नल अविनाश बी पडियार, मिल्टन दास, विशाल वेदक, चैताली घुमरे, सौम्या झा, श्रावणी पुजारी, श्रुती माने, कुसुम कुमावत या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
डॉ.एल.आर.यादव म्हणाले, हम अलग है, हम अलार्ड है, हे विधान प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठााने अ‍ॅथलेटिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना उत्कृष्ट संधी उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धता अधोरेखित केली आहे. आमच्या क्रीडा शिष्यवृत्ती आणि महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये कोल्हापूर टस्कर्सच्या प्रायोजकत्वाद्वारे युवा खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रोमांचित आहोत. आमचे विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विश्वास ठेवते आणि क्रीडा क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावते. येथील मैदान अत्याधुनिक क्रीडा सुविधांनी सुसज्ज आहे.
कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी म्हणाले, अलार्ड युनिव्हर्सिटी पुणेशी जोडले जाणे हा आमच्यासाठी सन्मान आहे. ही एक संस्था अशी आहे जी खरोखरच खेळ आणि तरूण प्रतिभा विकसित करण्यावर अधिक भर देते. क्रीडा शिष्यवृत्ती आणि तळागळातील खेळ हे कोल्हापूर टस्कर्ससाठी महत्वाचे प्रोत्साहन आहेत आणि या उपक्रमाचा भाग होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे.
अलार्ड युनिव्हर्सिटी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेची संस्कृती वाढविण्यासाठी आणि प्रतिभावन विद्यार्थ्यांना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यासाठी वचनबद्ध आहे. या वर्षी कुलधीपती डॉ.एल.आर.यादव आणि कॅप्टन राहुल त्रिपाठी यांनी शिष्यवृत्ती निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिकरित्या शिष्यवृत्तीचे पत्र दिले. ज्यामध्ये त्यांच्या विविध क्रीडा शाखेतील असामान्य प्रतिभा आणि क्षमता ओळखली जाईल.
महाराष्ट्र प्रीमियर लीग मधील कोल्हापूर टस्कर्स संघाला प्रायोजित केल्याबद्दल अलार्ड विद्यापीठाला अभिमान वाटतो. खेळांना पाठिंबा देण्यासाठी आणि तरुण खेळाडूंना चमकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ तळागळातील खेळांशी भागीदारी करण्यासाठी वचनबद्ध आहे.
महाराष्ट्र प्रीमियर लीग ही एक प्रमुख क्रिकेट स्पर्धा आहे जी राज्यभरातील सर्वोत्तम प्रतिभांना एकत्र आणते तसेच नवोदित क्रिकेटपटूंना स्पर्धात्मक वातावरणही देते.
हम अलग है, हम अलार्ड है, हे सर्वांना दाखवण्यासाठी विद्यापीठाने आपल्या कॅम्पसमध्ये फुटबॉल खेळासाठी फिफा आकाराचे मैदान तयार केले आहे. येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्याने विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडलेल्या खेळांमध्ये प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम केले आहे. हे फुटबॉल, क्रिकेट आणि इतर प्रमुख खेळांसाठी सुसज्ज आहे.
अलार्ड विद्यापीठ, पुणे.
मो.नं.९८५०५५४९९९
महाराष्ट्र प्रीमियर लीग : ही एक प्रसिद्ध क्रिकेट लीग आहे ज्याचा उद्देश राज्यातील क्रिकेट टॅलेंटला पाठिंबा देणे आणि त्याचे प्रदर्शन करणे आहे. या लिगला जोडून कोल्हापूर टस्कर्सचे प्रायोजकत्व आणि पुणे लीगला चालना देण्यासाठी आणि नवोदित क्रिकेटपटूंना आवश्यक ती मदत करण्यासाठी अलार्ड विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावत आहे.
अलार्ड युनिव्हर्सिटी पुणे बद्दल : अलार्ड युनिव्हर्सिटी शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे. व्यावहारिक शिक्षण आणि वास्तविक जगाच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करून उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी समर्पित आहे. हे विद्यापीठ ७० टक्के व्यावहारिक अध्यापन आणि ३० टक्के सिद्धांताचा एक अद्वितीय दृष्टीकोन देते. विद्यापीठ विद्यार्थ्यांना १०० टक्के गॅरंटीड इंटर्नशिपची खात्री देते. विद्यापीठ सर्वसमावेशक शैक्षणिक कार्यक्रम आणि अत्याधुनिक सुविधांद्वारे भविष्यातील नेते आणि नवकल्पनांना आकार देण्यासाठी वचनबद्ध आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!