Homeताज्या बातम्याबस थांबल्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्याला अटक.

बस थांबल्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्याला अटक.

बस थांबल्यावर प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन चोरट्याला अटक…

पुणे : बस थांब्यावर असलेल्या गर्दीत बसमध्ये चढणाऱ्या भोसरी  प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

मोहन गणेश जाधव (वय ३२ रा. मुंढवा, पुणे. मूळ रा. अंबरनाथ, मुंबई), शिवराज अर्जुन वाडेकर (वय २५, रा. मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बस प्रवासात तसेच बसमध्ये चढताना प्रवाशांचे दागिने चोरीला जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. त्यानुसार त्याबाबत कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. भोसरी पोलीस ठाण्यातील एक पथक पीएमटी चौक, भोसरी येथे गस्त घालत असताना त्यांना दोन संशयित व्यक्ती दिसले.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यात त्या दोघांनी नाशिक फाटा बस थांबा, पीएमटी बस थांबा भोसरी येथून प्रवाशांचे दागिने चोरल्याचे सांगितले. त्यांच्याकडून चार लाख २२ हजार रुपये किमतीचे ७२ ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त सचिन हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोहारे, सहायक फौजदार राकेश बोयने, अंमलदार हेमंत खरात, नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, प्रतिभा मुळे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक : विजयापेक्षा आत्मपरीक्षण महत्त्वाचे!

0
छत्रपती संभाजीनगर:(विशेष प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून जल्लोष साजरा...

पांगरा येथील बनामाई गोशाळेला विहिप राष्ट्रीय प्रवक्त्याची सदिच्छा भेट

0
जिल्हा:(प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधवपातूर) तालुक्यातील पांगरा येथील बनामाई गोशाळा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र येथे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते शंकरजी गायकर तसेच विदर्भ प्रांत गोरक्षा...

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

error: Content is protected !!