Homeताज्या बातम्याटाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; पुण्यात तब्बल १० नामांकित पब आणि...

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; पुण्यात तब्बल १० नामांकित पब आणि रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…

टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या बातमीचा इम्पॅक्ट ; पुण्यात तब्बल १० नामांकित पब आणि रेस्टॉरंटवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई…

पुणे :- टाईम्स ऑफ महाराष्ट्राने काही दिवसांपूर्वी अनेक पब आणि रेस्टॉरंटच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या, तसेच पुणे शहर पोलीसांना आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाला तक्रारी केल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काने संबंधित पब धारकांवर कारवाई केली आहे.
 
पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच युवक आणि युवती मोठ्या प्रमाणावर व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहे. अशा गोष्टींना रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासनही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहे. अशातच पुणे शहर परिसरात मध्यरात्री उशीरापर्यंत मोठ्या आवाजात पार्टी सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली आहे. 

अनियमित वेळेत नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये मोठ्या आवाजात साऊंड लावल्याप्रकरणी पुण्यातील तब्बल 10 नामांकित हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अनेक बातम्या आणि व्हिडीओ न्युजच्या माध्यमातून टाईम्स ऑफ महाराष्ट्रने प्रसिद्ध केल्या होत्या या कारणावरून पुणे शहराच्या अनके भागात तसेच उपनगरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे.

रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवणे, मद्य परवानाचे रजिस्टर न भरणे आणि विना परवाना मद्य विक्री करणाऱ्या पुण्यातील तब्बल १० नामांकित पब आणि हॉटेल्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ दिवसात पुण्यातील 10 हॉटेल्स आणि पबवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्युज असल्याचे अधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
 
कोण कोणत्या पब आणि हॉटेल्सवर  झाली कारवाई?

    प्लंज, कोरेगाव पार्क

    लोकल गेस्ट्रो बार

    युनिकॉर्न पब 

    आर्यन बार, बालेवाडी

    नारंग वेंचर

    हॉटेल मेट्रो

    बॉलर, कल्याणी नगर

    लेमन ग्रास, विमाननगर

    एलरो

    हॉटेल काकाज

कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमान नगर, मुंढवा, बंडगार्डन, बाणेर, हिंजेवाडी, बालेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत. तरूणाईला आकर्षित करण्यासाठी पबमध्ये अनेक सवलती दिल्या जात असल्याने युवक त्या ठिकाणी आकर्षित होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!