Homeताज्या बातम्याजुन्या भांडणातून दोन भावांवर हल्ला एकाला अटक कात्रजतील घटना

जुन्या भांडणातून दोन भावांवर हल्ला एकाला अटक कात्रजतील घटना

जुन्या भांडणातून दोन भावांवर हल्ला एकाला अटक कात्रजतील घटना…

पुणे : जुन्या भांडणाचा राग मनात धरून पाच जणांनी दोन भावांवर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कात्रज येथील जैन मंदिर रस्त्यावरील शांती मंदिराच्या भिंतीजवळ मंगळवारी (दि.१२) रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

याबाबत तुषार सुरेश जाधव (वय-26 रा. दत्तनगर पोलीस चौकी मागे, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संकेत रेणुसे, ओंकार पवार, प्रथमेश येणपुरे आणि इतर दोन अनोळखी मुलांवर आयपीसी ३०७, ३२३, ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अॅक्ट आर्म अॅक्ट नुसार गुन्हा (FIR) दाखल केला असून संकेत रेणुसे याला अटक केली आहे. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार जाधव यांना फटक्यांची ऑर्डर मिळाली होती.
त्यामुळे फिर्यादी हे त्यांचा भाऊ मयुर जाधव याला सोबत घेऊन फटाके देण्यासाठी जैन मंदिर येथून चालले होते.
त्यावेळी आरोपी संकेत रेणुसे याने फिर्यादी यांचा भाऊ निखील जाधव याच्यासोबत 2019 मध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन फिर्यादी यांना शिवीगाळ केली.

तर संकेत रेणुसे याच्यासोबत असलेल्या इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेला भाऊ मयुर याच्यावर कोयत्याने सपासप वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तुषार आणि मयुर जाधव जखमी झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!