Homeताज्या बातम्याभरधाव बसने दिली झाडाला धडक ; पुण्यात स्कुल बसचा भयानक अपघात...

भरधाव बसने दिली झाडाला धडक ; पुण्यात स्कुल बसचा भयानक अपघात…

पुणे : पुण्यामध्ये एका शाळेच्या बसचा अपघात झाला आहे. वाघोली इथल्या रायझिंग स्टार या शाळेची बस झाडाला आदळली आहे. बसमधले काही विद्यार्थी जखमी झाले. खासगी रुग्णालयामध्ये जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत.मात्र या अपघातामुळे पुन्हा एकदा स्कूल बसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 4 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना वाटेतच ही बस झाडावर जाऊन आदलली. अपघातानंतर मोठा आवाज झाला, त्यानंतर आजूबाजूचे लोक तातडीने मुलांच्या मदतीसाठी धावले. सुदैवाने या अपघाताने कुणालाही गंभीर इजा झाली नाही. बसची धडक इतकी जोरदार होती की समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओ समोर

या सीसीटीव्हीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर अत्यंत वेगाने स्कूल बस येऊन धडकताना दिसते. बसचा दरवाजाकडचा भाग झाडाला धडकल्यानंतर व्हिडीओमध्ये बसची डॅशबोर्डची काच उडून समोर पडताना दिसते. बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील मुलांचा आरडाओरड आणि किंकाल्याही ऐकू आल्याची माहिती समोर येत आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने या स्कूल बसमधील मुलांना बाहेर काढण्यास सुरूवात केली.

आरटीओचं नियंत्रण नाही

या अपघातात सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही. मात्र पैसै मोजूनही मुलांच्या सुरक्षेबद्दल असा बेजबाबदारपणा पाहून पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या बसेसवर आरटीओचे नियंत्रण नसल्याचा आरोप पालक वर्गाकडून केला जात आहे. आरटीओने अशा बसेसवर कारवाई करण्याची गरज असते. मात्र ती होताना दिसत नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

प्रभाग क्रमांक ६ मधील SIR मॅपिंग अभियानाला ७०० नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) दौंड शहरातील प्रभाग क्रमांक ६ अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजमंदिर चावडी, साठेनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या SIR मॅपिंग अभियानाला तब्बल ७०० नागरिकांनी...

शिक्षकांचा वृक्षारोपण करून सेवापूर्ती सोहळा संपन्न.

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा मेहुना राजा येथे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या तीन शिक्षकांचा सेवापुर्ती सत्कार सोहळा आज...

error: Content is protected !!