Homeताज्या बातम्यापुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग आता प्रवास खर्चाची होणार बचत

पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग आता प्रवास खर्चाची होणार बचत

पुण्यातून रायगडला जाण्यासाठी नवा मार्ग आता प्रवास खर्चाची होणार बचत… 

भोर : वेल्हे तालुक्यातील नवीन रस्त्याच्या कामाला भोरडी ते महाड तालुक्यातील शेवते यादरम्यान प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे रायगडला जोडणारा हा तिसरा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधी, तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५ कोटी रुपये असा एकूण ३० कोटी ३२ लाख रु. निधी मंजूर झाला आहे.

तर संशोधन आणी विकास विभागाकडे ४ कोटींची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या भोर तालुक्यातून वरंध घाट, तर मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटमार्गे रायगड जिल्ह्यात जाता येते. आता नव्याने वेल्हे तालुक्यातून रस्ता होणार असल्याने नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. गेली अनेक वर्षे वेल्ह्यातून महाडला जोडणारा रस्ता करावा, यासाठी नागरिकांची मागणी होती. आणि त्यासाठी आमदार संग्राम थोपटे सातत्याने प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, सदर रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, लवकरच काम सुरू होईल. वेल्हे ते मढेघाट मार्ग खडतर, सुरुवातीला या रस्त्यासाठी वेल्हे ते मढेघाट हा मार्ग निवडण्यात आला होता. त्याचे सर्वेक्षणदेखील झाले होते. मात्र, अतितीव्र चढ-उतार, नागमोडी वळणे, खडक व टेकड्यांचा भूभाग असल्याने नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल होती. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या काम करणे अतिशय खडतर होते. एवढेच नाही, तर भविष्यात वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक, त्रासदायक होऊ शकतो, असेही समोर आले.

पर्यायी रस्ता ठरला अंतिम…

यामुळे नव्याने भोरडी, पिशवी, गुगुळशी, पांगारी ते शेवते (रायगड) हा पर्यायी रस्ता आमदार संग्राम थोपटे यांनी सुचविला. संबंधित विभागाने त्याची पाहणी करून अहवाल राज्य सरकारकडे पाठविला. त्यानुसार १३ किलोमीटरच्या या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनमधून २५ कोटी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

प्रवासाचा वेळ वाचणार

वेल्हे ते भोरडी फाटा ते शेवते हा १८ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. यातील १३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मान्यता मिळाली आहे. यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २.८ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये सपाटीकरण करून साडेसात मीटर डांबरीकरण रस्ता पाच ठिकाणी पाइप टाकण्यात येणार असल्याचे वेल्हे सार्वजनिक बांधकाम विभागाने सांगितले. उर्वरित २.२ किलोमीटरच्या रस्त्याचा प्रस्ताव संशोधन व विकास (आर अँड डी) विभागाकडे पाठविला आहे. त्या कामासाठी ४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. नवीन मार्ग हा कमी अंतराचा होणार असल्यामुळे पुण्यातून महाड, रायगडला जाण्यासाठी प्रवासाचा वेळे वाचणार असून, इंधन आणि पैशांचीही बचत होणार आहे. तसेच या मार्गावरील पर्यटनालाही अधिक चालना मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

६ ऑगस्टला ब्रह्मपुरीत काँग्रेसचा जनआक्रोश महामोर्चा; शेतकरी, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तहसील कार्यालयावर...

0
आमदार विजय वडेट्टीवार व शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा सहभाग ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी, ओबीसी समाज तसेच श्रावणबाळ व संजय गांधी...

देलनवाडी वॉर्डात बिबट्याची दहशत: ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली ‘जंगल कॅट’

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) ब्रह्मपुरी शहरातील देलनवाडी वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चार दिवसांपूर्वी या भागातील रहिवासी...

error: Content is protected !!