Homeताज्या बातम्याउद्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन...

उद्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन…

उद्यापासून महाराष्ट्रात लॉकडाऊन…

मुख्यमंत्र्यांकडून अखेर महाराष्ट्रात १५ दिवसांच्या १४४ कलम संचारबंदीची घोषणा, एकूण ५४०० कोटी रूपयांचे पॅकेजही जाहीर…
मुंबई :- आता कोरोना रोखण्याचा दुसरा पर्यायच उरला नाही, असे सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अखेर लॉकडाऊनची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले.
कडक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावावे लागतील.
जीव वाचविणे महत्त्वाचे. उद्या रात्री ८.०० वाजल्यापासून निर्बंधांमध्ये वाढ करतोय. पंढरपूर – मंगळवेढा वगळून हे निर्बंध असतील.
अनावश्यक फिरणे बंद…
ब्रेक द चेन. राज्यात १५ दिवस १४४ कलम लागू. अनावश्यक फिरणे बंद. जनता कर्फ्यू तुम्हीच लागू करा.
सर्व अस्थापना बंद. सकाळी ७.०० ते ८.०० फक्त अत्यावश्यक सेवा चालू.
सार्वजनिक वाहतूक लोकल, बससेवा बंद नाहीत. त्या फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच चालू राहतील.
काय चालू राहणार…
वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, वैद्यकीय उत्पादक अस्थापने चालू राहतील.
पावसाळीपूर्व कामे चालू राहतील. सेबी, आरबीआय, बँका चालू राहतील.
बांधकामे, उद्योगांनी राहण्याची सुविधा वाढवून कर्मचाऱ्यांना तिथेच ठेवा. तेवढ्यापुरते उद्योग चालू ठेवता येतील.
हॉटेल, रेस्टॉरंट फक्त पार्सल सेवा. बाहेरच्या खाण्याच्या सेवा पार्सल सेवा चालू ठेवता येतील.
गरजू नागरिकांना मिळणार आधार…
राज्य सरकारमधून अन्नसुरक्षा प्रतिव्यक्ती तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत. ७ कोटी नागरिकांना लाभ.
शिवभोजन थाळी महिनाभर मोफत देणार. दोन लाख थाळ्या देणार. रोजी मंदावली तरी रोटी थांबू देणार नाही.
केंद्र – राज्यांच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना १००० रूपये आधीच देणार. ३५ लाख लोकांना याचा थेट फायदा.
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १५०० रूपये देणार. घरेलू कामगारांना १५०० रूपये देणार
अधिकृत नोंदणीकृत फेरीवाले १५०० रूपये. ५ लाख लाभार्थी. परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रूपये देणार. १२ लाख लाभार्थी.
आदिवासी खावटी कर्ज १२ लाख लाभार्थी. २००० रूपये देणार.
३३०० कोटी रूपये फक्त कोविडसाठी राखून ठेवले आहे.
एकूण ५४०० कोटी रूपये खर्च करून जनतेला आधार देण्यासाठी बाजूला काढतोय.
आजचा कोरोना पॉझिटिव्ह आकडा ६०२१२.वाढविलेल्या सुविधा आता कमी पडायला लागल्या आहेत.
यंत्रणा कोलमडून पडताहेत. चाचण्यांची संख्या अडीच लाखांपर्यंत दररोज करतोय. कोविड बेड राज्यात साडेतीन लाख केलेत. ५२३ चाचणी केंद्रे राज्यात आहेत. चाचणी केंद्रांवर बोजा वाढलेला आहे.
कोविड सेंटर्स ४००० च्या आसपास काढले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
१२०० मेट्रीक टन उत्पादन होते. ते १०० टक्के आरोग्यासाठी वापरतो. पण ऑक्सिजनची कमतरता पडते आहे. समाजातल्या सर्व घटकांना बरोबर घेतोय. मतभेद असू देत. पण आता निर्णय घ्यावा लागेल.
रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. याचा पुरवठा कमी पडून देणार नाही. ऑक्सिजनचा पुरवठा इतर राज्यांतून आणण्यासाठी पंतप्रधानांनी परवानगी दिली आहे. तो ईशान्येकडील राज्यांतून आणण्यासाठी विनंती पंतप्रधानांना केली आहे. हवाई वाहतूकीने एअर फोर्सला सांगून ऑक्सिजन देण्याची व्यवस्था करावी अशी विनंती पंतप्रधानांना करणार आहे. त्यांना पत्र लिहून फोन करेन.
उद्योदक, व्यावसायिक यांना जीएसटी परतावा मुदत तीन महिने वाढविण्याची पंतप्रधानांना मागणी.
कोरोना नैसर्गिक आपत्ती समजून संकटातील लोकांना वैयक्तिक मदत देण्याची पंतप्रधानांना मागणी.
आत्ताची लाट प्रचंड मोठी आहे. महाराष्ट्रातले लसीकरण वाढवून लाटेचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करतोय. गेल्यावेळची लाट रोखण्यात यशस्वी झालो. पण आता लाट रोखण्यासाठी काही वेगळे उपाययोजना कराव्या लागतील.
डॉक्टरांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करतोय. निवृत्त झालेल्या नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सरकारसोबत लढायला पुढे या.
आता उणीदुणी काढू नका. राजकारण करू नका. राजकारण बाजूला ठेवा. पंतप्रधानांना सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलविण्याचे आवाहन करतोय.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!