Homeताज्या बातम्याकोंढव्यातील एका हॉटेलात हल्ला ६ जणांवर गुन्हा दाखल

कोंढव्यातील एका हॉटेलात हल्ला ६ जणांवर गुन्हा दाखल

कोंढव्यातील एका हॉटेलात हल्ला ६ जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : हॉटेल मॅनेजर आणि कामगारांवर धारदार हत्याराने वार करून परिसरात दहशत निर्माण करणारा कोंढवा येथील सराईत गुन्हेगार गणेश बबन लोंढेसह त्याच्या ६ साथीदारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली.

याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून टोळी प्रमुख गणेश बबन लोंढे (२३, रा. साठे चौक, महंमदवाडी), विशाल माधव गोरे (२०, रा. तरवडे वस्ती), मयुर माणिक पुरकास्त (१८, रा. कृष्णानगर), ऋषिकेश विठ्ठल घाडगे (२०, रा. तरवडे वस्ती) आणि शुभम नंदू चव्हाण (१९, रा. मोहंमदवाडी) यांना अटक करून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. टोळी प्रमुख गणेश लोंढे याने गुन्हेगारांची टोळी तयार केली. या टोळीने मागील १० वर्षांत खुनाचा प्रयत्न, चोरी, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे, दरोड्याची तयारी, दहशत पसरवणे असे गंभीर गुन्हे केले आहेत. आरोपींवर पुणे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या अर्जाची छाननी करून अपर पोलिस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. या प्रकरणाचा पुढील तपास वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे करत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलिस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले, सहायक पोलिस निरीक्षक राजेश उसगावकर, गणेश तोरगल, पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख, पोलिस कर्मचारी जगदीश पाटील, राजेंद्र ननावरे, नितीन चव्हाण आणि प्रदीप बेडीस्कर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!