Homeताज्या बातम्यानिवडणूक जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान...

निवडणूक जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान…

निवडणूक जिंकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचे मुख्यमंत्री पदाबद्दल मोठं विधान…

भोपाळ : दोन दिवसांपूर्वी नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाने या निवडणुकीत काँग्रेसवर ३-१ ने मात केली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेकडच्या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसला मोठ्या फरकाने पराभूत केलं.

पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपासाठी हा आत्मविश्वास उंचावणारा विजय आहे. भाजपाने मिळवलेल्या या यशात मध्य प्रदेशच यश आहे. 

कारण तिथे बऱ्याच वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. प्रस्थापित भाजपा सरकार विरोधात तिथे कुठलीही लाट दिसली नाही. हे एक मोठ यश आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवलाय. पण आता तिथे मुख्यमंत्री कोण होणार? हा राजकीय विश्लेषकांना पडलेला प्रश्न आहे. कारण शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. विद्यमान विधानसभा निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली असली, तरी भाजपाचा चेहरा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीच होते. त्यामुळे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हा मुख्य मुद्दा आहे.

मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण? यावर चर्चा सुरु असतानाच शिवराज सिहं चौहान यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ‘मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नव्हतो आणि ना आहे’ असं शिवराज यांनी म्हटलं आहे. एमपी विधानसभा निवडणुकीत भाजपाने २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 66 जागांवर समाधान मानाव लागलं. ‘पंतप्रधान मोदी आमचे नेते आहेत. त्यांच्यासोबत काम करण ही सौभाग्याची गोष्ट आहे. मी भाजपा कार्यकर्ता आहे. मी जनतेचा ह्दयापासून आभारी आहे. मला जितकं शक्य झालं, तितक मी काम केलं’ असं शिवराज सिंह चौहान म्हणाले. त्यांनी ANI ही मुलाखत दिली.

भाजापच्या यशामागची गेम चेंजर योजना कुठली?

या निवडणुकीत शिवराज सिंह चौहानच भाजपाच्या विजयाचे खरे नायक आहे. 64 वर्षाच्या शिवराज यांनी राज्यातील प्रस्थापित सरकारविरोधी लाटेवर मात करुन विजय मिळवला. भाजपाच्या या विजयामागे सर्वाधिक चर्चा ‘लाडली बहना’ योजनेची आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपाच्या विजयासाठी या योजनेला गेम चेंजर म्हटलं जात आहे. पक्षाने निवडणुकीआधी शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रस्तुत केलं नव्हतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

error: Content is protected !!