Homeताज्या बातम्याAmit Shah, Mamata Banerjee : “अमित शहा vs ममता: बंगाल निवडणुकीत घुसखोरी...

Amit Shah, Mamata Banerjee : “अमित शहा vs ममता: बंगाल निवडणुकीत घुसखोरी व पहलगाम हल्ल्यावर वाद”

Times of Maharashtra Desk: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ३० डिसेंबर २०२५ पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकारवर निवडणुकीच्या फायद्यासाठी बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला. बांकुरा येथे एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले.या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची तुलना महाभारतातील दुर्योधन आणि दुशासन यांच्याशी केली. त्यांनी सांगितले, “शकुनीचा शिष्य दुशासन माहिती गोळा करण्यासाठी बंगालमध्ये आला आहे. निवडणुका जवळ आल्यावर दुशासन आणि दुर्योधन दिसतात.”

त्याचप्रमाणे, ममता बॅनर्जी यांनी पहलगाम हल्ला आणि दिल्लीतील दहशतवादी घटनांबाबतही केंद्रावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, “जर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी नसतील, तर पहलगामची घटना कशी घडली? पहलगाममध्ये हल्ला तुम्हीच घडवून आणला का?”केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ मधील बंगाल निवडणुकीत घुसखोरीच्या मुद्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. त्यांनी तृणमूल काँग्रेसवर आरोप केला की त्यांनी बांगलादेशच्या सीमेवर कुंपण बांधण्यासाठी जमीन दिली नाही. त्यावर ममता बॅनर्जी म्हणाल्या, “राज्याने जमीन दिल्याने सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज भाजप म्हणत आहे की मी जमीन दिली नाही, तर पेट्रापोल आणि अंदलमध्ये जमीन कोणी दिली?”

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एसआयआरवरही टीका केली. त्या म्हणाल्या, “एसआयआर हा एआयच्या मदतीने होणारा घोटाळा आहे. मतदार यादीतून जर एकाही वैध मतदाराचे नाव वगळले गेले, तर तृणमूल काँग्रेस दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाची घेराबंदी करेल. एसआयआरमुळे सुमारे ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. वृद्धांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवणे हा राज्यातील जनता सहन करणार नाही.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार; २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

0
जळगाव:(प्रतिनिधी : विनोद पवार) महिलांच्या विविध समस्या, तक्रारी व अडचणींचे प्रभावी आणि तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवार, २० जुलै २०२६ रोजी...

शिरपूर येथे आमदार काशिराम पावरा यांच्या उपस्थितीत ‘SIR’ बाबत महत्त्वाची आढावा बैठक संपन्न

0
​शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे)  येथील आमदार कार्यालयात 'SIR' (Special Intensive Revision) मोहिमेबाबत एक महत्त्वाची आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीला आमदार श्री. काशिराम पावरा...

चंद्रपूर महानगरपालिकेला लाभले ‘पळवाटा काढणारे’ आयुक्त? जनतेच्या प्रश्नांवर मौन, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर वाढते प्रश्नचिन्ह.

0
चंद्रपूर:(प्रतिनिधी निलेश ठाकरे)  चंद्रपूर महानगरपालिका सध्या विकासकामांपेक्षा राजकीय वाद, आरोप-प्रत्यारोप आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीमुळे अधिक चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे...

बीपीसीएल पाइपलाईन्स विभागाचा नांदूरमध्यमेश्वर येथे स्वच्छता अभियान

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)  दि. १४ जुलै २०२६ : केंद्रीय पेट्रोलियम मार्गदर्शनाखाली देशभर १ ते १५ जुलै दरम्यान साजरा होत असलेल्या "स्वच्छता पंधरवाडा – २०२६"...

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

error: Content is protected !!