Homeताज्या बातम्याबहिणीचा प्रेमसंबंद असल्याने दोन भावांकडून तरुणाचा खून सांगलीतील घटना

बहिणीचा प्रेमसंबंद असल्याने दोन भावांकडून तरुणाचा खून सांगलीतील घटना

बहिणीचा प्रेमसंबंद असल्याने दोन भावाकडून तरुणसा खून सांगलीतील घटना…

कुपवाड : बहिणीबरोबर प्रेमप्रकरण असल्याच्या राग मनात धरून बामणोली, दत्तनगर ( ता. मिरज) येथील ओम श्रीधर देसाई (वय १९ रा.दत्तनगर, बामणोली) या युवकाचा संशयित ओंकार जावीरसह अन्य तिघांकडून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

काल, रविवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास दत्तनगर मधील खुल्याजागेत ही घटना घडली. या घटनेची कुपवाड पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याप्रकरणी जावीरसह त्याच्या इतर तिघा मित्रावर गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक करण्यात आली.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये ओंकार निलेश जावीर (वय २०), रोहित बाळासाहेब केंगार (१८), सोहम शहाजी पाटील (२०), ज्ञानेश्वर पाटील (२०, रा. चौघेही दत्तनगर,बामणोली) यांचा समावेश आहे. यापैकी ओंकार जावीर आणि सोहम पाटील याला अटक केली आहे. तर कुपवाड पोलीसांनी रोहित केंगार याला अटक केली आहे. ज्ञानेश्वर पाटील फरार आहे. मृत ओम देसाई याचा भाऊ आदेश देसाई यांनी या घटनेची कुपवाड पोलीसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत ओम देसाई हा कुपवाड एमआयडीसीतील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. रविवारी रात्रीच्या सुमारास ओम हा जेवण करून कुटुंबीयांसोबत बसला होता. दरम्यान संशयित ओंकार जावीर याने मृत ओमला दत्तनगर येथील खुल्या जागेत फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ओंकारने ओम याला तू माझ्या बहिणीच्या मागे का लागला आहेस असा जाब विचारला. यावेळी दोघात शाब्दिक बाचाबाची झाली.

दरम्यान, जावीर आणि त्याचे मित्र सोहम पाटील, ज्ञानेश्वर पाटील व रोहित केंगार याने चाकू व कोयत्याने ओमच्या पोटात व डोक्यावर सपासप वार केले. या खूनी हल्ल्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यावेळी आरडाओरडा पाहून लगतच असलेला त्याचा भाऊ घटनास्थळी दाखल झाला. ओमला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ओमचा मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वृद्ध , दिव्यांग व निराधार लाभार्थ्यांसाठी विशेष आधार सेवा शिबिर १३ व १४ जुलै...

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)बीड ,जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली , अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक यांच्या नियंत्रणाखाली तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या...

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

error: Content is protected !!