Homeताज्या बातम्याPimpri Chinchwad: अनधिकृत पार्किंग आणि सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी; भोसरी, इंद्रायणी नगर...

Pimpri Chinchwad: अनधिकृत पार्किंग आणि सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी; भोसरी, इंद्रायणी नगर रस्त्यावरील चिंताजनक परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

गणेश नारंग, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी: भोसरी, पुणे, नाशिक महामार्गावरून इंद्रायणी नगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंगची समस्या निर्माण झाली असून, सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत हा रस्ता अक्षरशः ठप्प होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांची मनमानी पार्किंग, त्यातच सीएनजी पंपावरची वाढणारी गर्दी यामुळे वाहतूक कोंडी दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत आहे.

अरुंद झालेल्या रस्त्यामुळे कामगारांच्या बसेस, शालेय वाहनांच्या रांगा आणि पादचार्‍यांची झुंबड उडत आहे. मोठ्या वाहनांच्या मधून मार्ग काढताना ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका सतत डोके वर काढत असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.

रस्त्यावर अनधिकृत वाहनांची गर्दी असल्याने रस्ता स्वच्छता देखील ठप्प झाली आहे. धूळ, कचरा आणि अडथळे यामुळे परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने डोळेझाक केल्याची टीका स्थानिकांकडून होत आहे. नागरिकांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जयदीप करपे यांनी महापालिका व वाहतूक विभागाला तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अनधिकृत पार्किंग हटवणे, वाहतूक शिस्त प्रस्थापित करणे आणि रस्ता मोकळा करण्यासाठी त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!