Homeताज्या बातम्यापुणे आरटीओची मोठी कारवाई तब्बल ५५ खासगी ट्रॅव्हल्सकडून दंड वसूल...

पुणे आरटीओची मोठी कारवाई तब्बल ५५ खासगी ट्रॅव्हल्सकडून दंड वसूल…

पुणे : राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे आरटीओ नोंदणी करून महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर पुण्यात कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत पुणे ‘आरटीओ’ने अशा ५५ ट्रॅव्हल्स बसवर कारवाई करून दंड वसूल केला आहे.

शहरातून दररोज हजारो ट्रॅव्हल्स धावतात. त्यामुळे पुण्यातून इतर शहरांत जाणाऱ्या प्रवाशांची सोय होते; पण काही ट्रॅव्हल्सची नोंदणी इतर राज्यांत करून त्या महाराष्ट्रात चालविल्या जात आहेत. त्यामुळे पुणे आणि राज्याचा महसूल बुडत होता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे ‘आरटीओ’ने त्यांच्या ‘भरारी पथका’मार्फत परराज्यात नोंदवून पुण्यात चालविल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा शोध सुरू केला.या मोहिमेत पुण्यात ५५ ट्रॅव्हल्स बस या परराज्यात नोंदणी करून महाराष्ट्रात चालविल्या जात असल्याचे आढळून आले. त्यानुसार ‘आरटीओ’ने या ५५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली.काही खासगी ‘ट्रॅव्हल्स’चे चालक परराज्यात बसची नोंदणी करतात. त्या वेळी व्यवसायिक वाहनांचा कर त्या राज्यात भरला जातो; पण त्यानंतर ट्रॅव्हल्सवाले त्या बस महाराष्ट्रातील दोन शहरांदरम्यान चालवितात. त्यामुळे महाराष्ट्राचा कर यात बुडवला जातो. हे लक्षात घेऊन पुणे ‘आरटीओ’ने परराज्यात नोंदणी असणाऱ्या बसवर कारवाई सुरू केली आहे.

मोटार वाहन कायद्या’नुसार त्या राज्यात नोंदणी केलेल्या बस त्याच राज्यात चालविल्या जाव्यात. एक शहर नोंदणी केलेल्या राज्यात, तर दुसरे शहर बाहेर असले, तरी चालत होते; पण त्यातही आता बदल करण्यात आला आहे.पुणे ‘आरटीओ’च्या ‘भरारी पथका’ने काही दिवसांत परराज्यात नोंदणी केलेल्या; पण राज्यात धावणाऱ्या ५५ खासगी बसवर कारवाई केली आहे. त्यामुळे या खासगी बसवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. यापुढेदेखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे ‘आरटीओ’कडून स्पष्ट करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!