Homeताज्या बातम्याइंदोरमध्ये भाजपाला लाभले यश ; यशामुळे विश्वजीत राणेंचे महत्त्व वाढले...

इंदोरमध्ये भाजपाला लाभले यश ; यशामुळे विश्वजीत राणेंचे महत्त्व वाढले…

इंदोर : मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणूक निकालावेळी इंदूर परिसरातील व भाजपचे सर्व नऊ उमेदवार निवडून आल्याने भाजपच्या केंद्रीय वर्तुळात मंत्री विश्वजीत राणे यांचे राजकीय महत्त्व व वजन वाढले आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विश्वजीत राणे यांना फोन करून अभिनंदन केले.

३० वर्षांनंतर प्रथमच इंदूरमध्ये भाजपचे नऊ उमेदवार निवडून आले. विश्वजीत राणे हे ४४ दिवस – इंदूरमध्ये तळ ठोकून होते. निवडणूक – प्रचारावेळी विश्वजीत यांच्याकडे भाजप प्रभारी म्हणून सहा मतदारसंघांची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या शिवाय अन्य तीन मतदारसंघांमध्ये ते उमेदवारांना सहकार्य करत होते. उमेदवारांमध्ये व पक्षीय यंत्रणेच्या कामात समन्वय ठेवत होते. सर्व उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून विश्वजीत यांनी काही सभांवेळीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

आपल्याकडे सोपवलेल्या सहापैकी पाच मतदारसंघांत तरी निश्चितच भाजप जिंकेल, असे विश्वजीत यांनी केंद्रीय नेत्यांना सांगितले होते. तथापि, सर्व सहा उमेदवार जिंकले. शिवाय बाजूच्याही तीन मतदारसंघांत भाजपचे उमेदवार जिंकल्याने हा चर्चेचा विषय बनला. अर्थात भाजपने दिलेले प्रत्येक उमेदवार हे प्रबळ होते. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी राणे यांनाही श्रेय दिले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी मेसेजद्वारे राणे यांचे अभिनंदन केले. कैलाश विजयवर्गीय, रमेश मेंदोला, गोलू शुक्ला, मालिनी गौड, महेंद्र हाडीया, मधू वर्मा, मनोज पटेल, उषा ठाकुर, लुससी सिलावट हे उमेदवार जिंकले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत ग्रामसचिवालयाचे लोकार्पण

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर तालुक्यातील कृष्णनगर (डुबेरेवाडी) येथे अद्ययावत सुविधांनी सुसज्ज ग्रामसचिवालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले....

झिंगानूर आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त सीडबॉल उपक्रम; विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जागृती

0
  टाइम्स ऑफ महाराष्ट्र सिरोंचा | तालुका प्रतिनिधी : जाबिर खान सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत वन महोत्सवानिमित्त वन विभागाच्या वतीने सीडबॉल (बियांचे गोळे) प्रसारणाचा...

ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रकार थांबवा – महाराष्ट्र नवनिर्माण सेना

0
(शिरपूर प्रतिनिधी):  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरपूर तालुका अध्यक्ष पुनमचंद आनंदा मोरे यांनी महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मनसेकडे...

error: Content is protected !!