Homeताज्या बातम्यापीएमसी अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर - मुकुंद किर्दत.

पीएमसी अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर – मुकुंद किर्दत.

पीएमसी अभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल पुणे महानगरपालिकाही भ्रष्टाचाराचे आगर – मुकुंद किर्दत…

पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या टेबल ड्रॉवरमध्ये पीएमसी जवळपास दोन ते तीन लाख रुपयांची रक्कम असलेले बंडल सापडले. यावर महानगरपालिका पथविभागाचे प्रमुख पावस्कर यांनी वरिष्ठांशी बोलतो असे मोघम उत्तर दिल्यामुळे या संदर्भात आता आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग तसेच महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

सदरचे पैसे कोणत्या व्यक्तीकडून आले, त्या व्यक्तीचा ठेकेदाराशी संबंध काय? तसेच या ठेकेदाराकडे कोणकोणती कंत्राटे आहेत? या सर्वांची चौकशी होणे आवश्यक आहे. महानगरपालिका हे आता भ्रष्टाचाराचे आगर झाले असून अर्थिक वर्षाखेरीस अधिकाऱ्यांवर टक्के वारीचा पाऊस पडतो. डबल इंजिन सरकारच्या थेट अधिपत्याखाली असलेले प्रशासनही भ्रष्टाचारीच आहे. महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे हे केवळ छोटे टोक आहे अशी प्रतिक्रिया मुकुंद किर्दत यांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी, की आपचे पिंपरी – चिंचवड युवक शहराध्यक्ष रविकांत काळे हे कामानिमित्त महापालिकेच्या पथ विभागात गेले असताना त्यांना संशयास्पद हालचाली दिसली. त्यावेळेस कार्यालयातील कनिष्ठ पीएमसी अभियंताला येथे एका ठेकेदाराने नोटांचे बंडल असलेले बंद पाकीट दिल्याचे काळे यांनी पाहिले. या अभियंत्याने हे पाकीट टेबलाच्या ड्रायव्हर मध्ये ठेवून दिले. हा प्रकार पाहिल्यावर काळे व त्यांच्या सहकाऱ्याने संबंधित अभियंताला विचारणा केली. त्यावर या अभियंताने एका ठेकेदाराने पैसे थोड्या वेळासाठी ते आपल्याकडे ठेवायला दिले असल्याचे सांगत उडवा उडवीची उत्तरे दिली.

मात्र काळे यांनी ड्रॉवर मधून पाकीट काढल्यावर त्यात दोन ते तीन लाखाची रक्कम असल्याचे दिसून आले. आपच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उजेडात आणल्यावर संबंधित अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पालिकेतील लाच खोरीचा पर्दाफाश झाला आहे. या सर्वांचे व्हिडिओ चित्रिकरण व्हायरल झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

प्राचार्य.डा.राख सर यांची बिड आकाशवाणी वर मुलाखत.

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): जगदंबा व जयभवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ बी. फार्मसी, शिवाजीनगर गढी येथील प्राचार्य डॉ. महारूद राख यांची आकाशवाणी केंद्र बीडने...

error: Content is protected !!