Homeक्राईममानवतमध्ये जनावरे चोरी प्रकरण उघड; आरोपी ताब्यात, २१ हजारांचा बोकड जप्त

मानवतमध्ये जनावरे चोरी प्रकरण उघड; आरोपी ताब्यात, २१ हजारांचा बोकड जप्त

प्रवीण चौधरी (परभणी प्रतिनिधी) :  मानवत तालुक्यातील मंगरुळ परिसरात घडलेल्या शेळी-बोकड चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीच्या घरातून सुमारे २१ हजार रुपये किमतीचा बोकड जप्त करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मानवत पोलीस ठाण्यात गुरनं ७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. संबंधित तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान मंगळवारी (दि. २४) स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी विवेकानंद पाटील, रंगनाथ दुधाटे, चंदनसिंह परीहार आदींचे पथक गस्तीवर असताना त्यांना साखला प्लॉट परिसरात संशयित हालचालीबाबत गोपनीय माहिती मिळाली.

माहितीनुसार राहुलसिंग दारासिंग दुधानी (रा. साखला प्लॉट परिसर) याने मानवत तालुक्यातील मंगरुळ येथून शेळी व बोकड चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान घरातून २१ हजार रुपये किमतीचा बोकड जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपीने कालासिंग गुरुबच्चनसिंग दुधानी यांच्या मदतीने दुचाकीवरून जनावरे चोरी केल्याची कबुली दिली आहे. चोरी केलेली जनावरे इतरत्र विक्री करण्याचा त्यांचा उद्देश असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक गुन्हा शाखेने आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मानवत पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केले असून फरार असलेल्या अन्य साथीदाराचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरातील जनावरांच्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, नागरिकांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!