Homeताज्या बातम्यापुण्यात ढगाळ वातावरण ; तर इंदापूर,बारामतीमध्ये मुसळदार पाऊस...

पुण्यात ढगाळ वातावरण ; तर इंदापूर,बारामतीमध्ये मुसळदार पाऊस…

पुण्यात ढगाळ वातावरण ; तर इंदापूर,बारामतीमध्ये मुसळदार पाऊस

पुणे : पावसाळ्यामध्ये पुणे जिल्ह्यात कमी पाऊस झाला. तो देखील पूर्व भागात कमी आणि पश्चिम भागात अधिक झाला. परंतु, आता मॉन्सूनोत्तर पावसाने मात्र इंदापूर, बारामती परिसरात बुधवारी मोठ्या पावसाची नोंद झाली आहे.बारामतीमध्ये १७ तर इंदापूरमध्ये ३८.५ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. पुणे शहरात मात्र बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच आज (दि.३०) देखील सकाळपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव पुणेरकांना येत आहे.गेल्या तीन-चार दिवसांपासून पुणे शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहे. आज (दि.३०) नाशिक जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, वीज, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

उत्तर केरळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा बनला आहे. तर महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे राज्यात ढगाळ हवामान असून, उकाड्यात वाढ पहायला मिळत आहे.

आज (दि.३०) उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.पुणे शहरामध्ये पावसाळी वातावरण, ढगाळ हवामान यामुळे उकाड्यात वाढ झाली असून, कमाल तापमानात मोठी घट झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्क येथे २१ ते २२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज सकाळी नोंद झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

0
विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या...

यूपीएससीत यश संपादन केलेल्या कु. शिवम वखरे यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान

0
जळगाव  (प्रतिनिधी  विनोद पवार) : जळगाव जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे (IAS) यांच्या हस्ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात यूपीएससी २०२५ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

PMC: पुणे महानगरपालिकेत ‘प्रभारी’ राजचा उच्छाद! पात्रता नसताना योगेश हेंद्रेंना रेड कार्पेट?

0
Times of Maharashtra Desk, Pune: एकीकडे सुशिक्षित तरुण नोकरीसाठी वणवण भटकत असताना, पुणे महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात मात्र नियमांची अक्षरशः पायमल्ली होत असल्याचे...

गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयात ‘आधार’ आणि ‘सेतू’ केंद्र वाटपात कोट्यवधींचा महाघोटाळा; नियमांची पायमल्ली करत अपात्रांना...

0
Times Of Maharashtra Desk ,Gondia: महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक कारभाराला हरताळ फासत गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान (DIT) विभाग आणि महा-IT च्या काही अधिकाऱ्यांनी...

मालेगावच्या कुकाणे येथील शाळेत २६ लाखांचा प्रवेश घोटाळा; मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईचे आदेश

0
Times Of Maharashtra Desk : मालेगाव जि.नाशिक शिक्षणाच्या पवित्र मंदिरात पैशांची मोठी लूट सुरू असल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून समोर...

error: Content is protected !!