Homeउद्योगआखाती तणावाचा परिणाम; व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉटेल उद्योग चिंतेत

आखाती तणावाचा परिणाम; व्यावसायिक गॅस टंचाईमुळे हॉटेल उद्योग चिंतेत

Times Of Maharashtra Desk :आखाती भागातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम आता शहरांमधील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता वाढली आहे. सध्या काही हॉटेल्सकडे असलेल्या शिल्लक गॅस साठ्यावर व्यवसाय सुरू असला तरी परिस्थिती अशीच राहिल्यास पुढील दोन दिवसांत सुमारे २० टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे टंचाई 

याबाबत  प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस तुटवड्याची स्थिती मान्य केली. त्यांनी सांगितले की, सध्या जगभरात अस्थिरता निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतावरही होत आहे. पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. केंद्र सरकारने राज्य सरकार आणि गॅस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवून एलपीजी गॅस उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

भुजबळानच्या मते घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ही केंद्र सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायासाठी गॅस पुरवठ्याबाबत तातडीने काही करता येणार नाही. हॉटेल व्यावसायिकांना पर्याय म्हणून केरोसीन वापरण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र त्यासाठी सर्व यंत्रणा बदलाव्या लागतील असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. गॅस सिलेंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी पुरवठा अधिकाऱ्यांना कडक सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक विक्रेत्याची कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नगरिकांनी आफवांवर विश्वास ठेवू नये.

दरम्यान, कोल्हापुरात घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी करू नये असे आवाहन करूनही दुसऱ्या दिवशीही सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्या. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना अतिरिक्त साठा करू नये, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सध्या केवळ रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांनाच व्यावसायिक गॅस पुरवठा करण्यात येत असून हॉटेल्ससाठी गॅस वितरण तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे.

सोलापुरातही अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील रामवाडी परिसरातील गॅस एजन्सीसमोर घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांची मोठी रांग लागली. इराण,इस्त्राईल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पुढे गॅस मिळेल की नाही या भीतीने अनेक ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग सुरू केली आहे. अचानक वाढलेल्या बुकिंगमुळे गॅस कंपन्यांच्या ऑनलाइन बुकिंग प्रणालीत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून त्यामुळे अनेक नागरिक स्वतः एजन्सीकडे जाऊन सिलेंडर घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!