Homeमहाराष्ट्रशिरूरअनंतपाळ,येथून लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी.

शिरूरअनंतपाळ,येथून लांब पल्ल्याच्या एसटी बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी.

Times Of Maharashtra Desk : शिरूर अनंतपाळ तालुक्यातून राज्यातील विविध शहरांकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. याबाबत विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ लातूर यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून पुणे, संभाजीनगर (औरंगाबाद), परभणी, लातूर, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी जाण्यासाठी सध्या थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, नोकरी करणारे तसेच व्यापारी वर्गाला प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः शिरूर अनंतपाळ येथून पुणे, संभाजीनगर, परभणी, लातूर, मुंबई व नाशिक या मार्गांवर लांब पल्ल्याच्या एसटी बस सेवा सुरू केल्यास तालुक्यातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. सध्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून त्यामुळे आर्थिक भार वाढत आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवर लवकरात लवकर एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावेळी शिरूर अनंतपाळ येथील नागरिकांनी स्वाक्षरी करून निवेदन सादर केले. निवेदन देताना धनंजय देवंग्रे व संदीप धुमाळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!