Homeआरोग्यमहिला दिनानिमित्त गढी येथे आरोग्य तपासणी शिबिर; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महिला दिनानिमित्त गढी येथे आरोग्य तपासणी शिबिर; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

विष्णु गायकवाड ( गेवराई प्रतिनिधी ) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गेवराई तालुक्यातील गढी येथे रागिनी प्रतिष्ठानच्या वतीने महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर व जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम डॉ. शशिकांत मुळे हॉस्पिटल येथे पार पडला. महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि नियमित तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित महिलांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डॉ. शशिकांत मुळे यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन केले. विशेषतः महिलांमध्ये वाढत चाललेल्या हृदयविकारांच्या समस्यांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे, त्याची कारणे, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच तणावमुक्त जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित वैद्यकीय तपासणी केल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

या आरोग्य तपासणी शिबिरात अनेक महिलांनी सहभाग घेत आपली आरोग्य तपासणी करून घेतली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रागिनी प्रतिष्ठानच्या कार्यवाहक रागिणी मुळे यांच्यासह आरती गायकवाड, सविता सोनवणे, सुमती मुळे, वैष्णवी मुळे, रेणका कुलकर्णी, लता पठारे, स्मिता कुलकर्णी, संजीवनी पखाले, संगिता जाधव आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व महिला व मान्यवरांचे आभार रागिनी प्रतिष्ठानच्या कार्यवाहक रागिणी मुळे यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीमाच्या पाठपुराव्याला मोठे यश; गुळवंच एमआयडीसीच्या १८ इंच पाणीपुरवठा पाइपलाइनचे रखडलेले काम अखेर सुरू

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा)च्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले असून, गेल्या आठ महिन्यांपासून रखडलेले माळेगाव–गुळवंच एमआयडीसीसाठीच्या १८ इंच...

दोडी महाविद्यालयात NEP-2020 आधारित पदवी अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

0
सिन्नर, दि. २९ : तालुक्यातील श्री ब्रह्मानंद स्वामी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय, दोडी बु. येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या...

दौंड-गोपाळवाडी रोडवर एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे)  दौंड-गोपाळवाडी रोडवर हायटेन्शन वीजवाहिनी अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना एमएससीबीच्या कामामुळे मुख्य पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली. या घटनेत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

error: Content is protected !!