Homeताज्या बातम्यायेत्या लोकसभा निवडणुकीला मावळमध्ये महायुतीचा उमेदवार मीच असणार ; श्रीरंग बारणे म्हणाले...

येत्या लोकसभा निवडणुकीला मावळमध्ये महायुतीचा उमेदवार मीच असणार ; श्रीरंग बारणे म्हणाले…

येत्या लोकसभा निवडणुकीला मावळमध्ये महायुतीचा उमेदवार मीच असणार ; श्रीरंग बारणे म्हणाले…

लोणावळा (पुणे) : लोकसभेला महायुतीचा मावळचा उमेदवार मीच असणार आणि विजयीही मीच होणार. हा माझा फाजील आत्मविश्वास नाही तर ठाम विश्वास आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

खा. बारणे म्हणाले, मी जनतेत राहून काम करणारा लोकप्रतिनिधी आहे. मागील २७ वर्षे मी लोकप्रतिनिधी आहे. या काळात डोक्यात किंवा अंगात कोणतीही हवा शिरू दिलेली नाही. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना काय काम केले, हे मी जनतेला सांगेन. कोणीतरी राजकीय द्वेषातून व सुडापोटी मी काय काम केले, असे विचारत असेल तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही.

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी पक्षाने सांगितले तर मी लोकसभा लढवायला तयार आहे, असे म्हटले होते. त्याबाबत खासदार बारणे म्हणाले, भाजपचे नेते अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे जे खासदार मुख्यमंत्र्यांसोबत आहेत, त्यांनाच तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. बाळा भेगडे यांनी वरिष्ठांकडून माहिती घ्यावी. भाजपच्या या दोन नेत्यांशिवाय निर्णय घेणारा अजून कोणी आहे, असे मला वाटत नाही.

राष्ट्रवादीने मावळच्या जागेवर दावा केला आहे. यावर खा. बारणे म्हणाले, राष्ट्रवादीला त्यांची ताकद वाढली आहे, असे वाटत असेल तर त्यांनी खुशाल मागणी करावी. मागील काळात मी राष्ट्रवादीचा दोन लाख मतांनी पराभव केला आहे. आजमितीला माझ्यासमोर कोणीही इच्छुक नाही. मग येणाऱ्या निवडणुकीत मीच उमेदवार आहे, असे म्हटले तर कोणाच्या पोटात कशाला दुखायला पाहिजे?

राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप

खा. बारणे म्हणाले की, मी नऊ वर्षे खासदार आहे. या काळात माझा कोठेही ठेका नाही. माझे कार्यकर्ते कोणाकडे जात नाहीत. मी कोणावर टीकाटिपण्णी करत नाही. सरळमार्गी आहे, तरी केवळ राजकीय आकसापोटी माझ्यावर आरोप केले जात आहेत. त्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल.

मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का?

खा. बारणे म्हणाले की, निवडणुका आल्या म्हणून वातावरण निर्माण करण्यासाठी काहीजण आरोप करत आहेत. मी मोदी लाटेवर निवडून आलो, असे सांगत आहेत. मग त्यांचा किंवा अजित पवार यांचा नरेंद्र मोदींच्या करिष्म्यावर विश्वास नाही का? तुम्ही कोणत्या विचारांनी महायुतीत आलात, याचेही उत्तर द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!