Homeताज्या बातम्यारिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ अमेरिका,एचडीएफसीसह ५ बँकांना दंड ठोठावला ; काय आहे...

रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ अमेरिका,एचडीएफसीसह ५ बँकांना दंड ठोठावला ; काय आहे कारण ?…

रिझर्व्ह बँकेनं बँक ऑफ अमेरिका,एचडीएफसीसह ५ बँकांना दंड ठोठावला ; काय आहे कारण ?…

रिझर्व्ह बँक: रिझर्व्ह बँकेनं गुरुवारी, ३० नोव्हेंबर रोजी बँक ऑफ अमेरिका आणि एचडीएफसी  बँकेला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर्थिक दंड ठोठावला. अनिवासी भारतीयांकडून (एनआरआय) ठेवी स्वीकारण्याशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल या दोन्ही बँकांना दंड ठोठावण्यात आला आहे.

दंडाची रक्कम १० हजार रुपये आहे. याशिवाय एका वेगळ्या प्रकरणात आरबीआयनं देशातील तीन सहकारी बँकांनाही दंड ठोठावला आहे. यापूर्वीही आरबीआयनं अलीकडेच अनेक सहकारी बँकांना दंड ठोठावला आहे.

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट १९९९ च्या कलम ११ (३) अंतर्गत त्यांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून, या दोन बँकांवर (एचडीएफसू बँक आणि बँक ऑफ अमेरिका) कारवाई केली आहे. कारवाई करण्यापूर्वी दोन्ही बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती, असं रिझर्व्ह बँकेनं आणखी एका निवेदनाद्वारे सांगितलं.

‘रिझर्व्ह बँकनेनं कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. त्याला बँकांकडून लिखित उत्तर मिळालं आणि त्यांनी तोंडी युक्तीवादही केला. सर्व माहिती आणि बँकांच्या उत्तरांवर विचार केल्यानंतर नियमांचं उल्लंघन झाल्याच्या निष्कर्षावर रिझर्व्ह बँक पोहोचली. अशा परिस्थिती त्यांच्याकडून दंड आकारणं आवश्यक आहे,’ असंही रिझर्व्ह बँकेनं नमूद केलंय.
या सहकारी बँकांनाही दंड
रिझर्व्ह बँकेनं तीन सहकारी बँकांनाही दंडही ठोठावला आहे. तिन्ही नागरी सहकारी बँका आहेत. यामध्ये ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक, पाटलीपुत्र सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक आणि मंडल नागरीक सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनं एका निवेदनात म्हटलं की, ध्रंगध्रा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला दुसऱ्या बँकेत ठेवी ठेवण्याशी संबंधित नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर सूचनांचं पालन न केल्याबद्दल, बिहारस्थित पाटलीपुत्र सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेला १.५० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं गुजरातमधील अहमदाबादच्या मंडल नागरीक सहकारी बँकेला १.५० लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिन्नरच्या प्रिषा घोलपचा प्रथम क्रमांक

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड ) चंद्रपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अंडर-११ खुली व मुलींची फिडे रेटेड बुद्धिबळ निवड स्पर्धा-२०२६ मध्ये सिन्नर येथील सिक्रेट हार्ट...

दौंडमध्ये जय मल्हार आषाढी पायी दिंडीचे भक्तिमय स्वागत; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांचा वारकरी...

0
दौंड: (प्रतिनिधी संघराज गायकवाड) जय मल्हार आषाढी पायी दिंडी, ढोकसांगवी (ता. शिरूर, जि. पुणे) पालखीचे श्री दत्त पीठ, दत्त मंदिर येथे अत्यंत भक्तिमय व...

भारतीय विद्यार्थ्यांची जागतिक पातळीवर सुवर्णमय झेप!

0
जळगाव:(प्रतिनिधी विनोद पवार) ५६ व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड (IPhO) २०२६ मध्ये भारतीय संघाने सर्व पाच सुवर्णपदके पटकावत देशाचा गौरव उंचावला आहे. कोलंबियातील बुकारामांगा येथे...

दौंड परिसरातील पाच शाळांमध्ये ५० देशी वृक्षांचे वृक्षारोपण

0
दौंड, प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त केशव माधव विश्वस्त निधी आणि कर्वेनगर येथील सह्याद्री प्रभात शाखेच्या संयुक्त विद्यमाने दौंड शहर व ग्रामीण...

सहा महिन्यांनंतर बजाजनगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू १३ व १४ जुलै रोजी दोन...

0
वाळूज:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज एमआयडीसीतील बजाजनगर परिसरात तब्बल सहा महिन्यांनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेला आज (दि. १३ जुलै) सुरुवात करण्यात आली. एमआयडीसी प्रशासन, महसूल विभाग,...

error: Content is protected !!