Homeआरोग्य‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

‘निसर्ग वाचवा, गाव वाचवा’ तोंडोळीत अवैध वृक्षतोडीविरोधात तरुणांचा एल्गार

विकास चव्हाण ( पुणे प्रतिनिधी ) : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी ग्रामपंचायत हद्दीत सध्या अवैध वृक्षतोडीमुळे गंभीर पर्यावरणीय संकट निर्माण होत आहे. गेल्या काही वर्षांपासून परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल सुरू असून, यामुळे कोरडेपणा आणि पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत चालली आहे. तोंडोळी गावासह सेवानगर तांडा, हरिहारेश्वर वस्ती, भारट वस्ती, धनगर वाडा आणि इतर लहान वस्त्यांमध्ये झाडांची संख्या झपाट्याने घटत आहे.

एकीकडे शासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’सारख्या मोहिमांवर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, स्थानिक स्तरावर मात्र ग्रामपंचायतीकडून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. विशेषतः गावातील सुशिक्षित आणि जागरूक तरुणांनी या परिस्थितीविरोधात आवाज उठवला असून, वृक्षतोड थांबवण्यासाठी त्यांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. मात्र, प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.

गावकऱ्यांनी आता Forest Department म्हणजेच वनविभागाने तातडीने हस्तक्षेप करून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी केली आहे. तसेच परिसरात वृक्षसंवर्धनासाठी विशेष मोहीम राबवून हरित क्षेत्र वाढवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली आहे.

दरम्यान, तरुणांनी नागरिकांनाही पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. आज झाडे वाचवली नाहीत, तर उद्या पाणी आणि शुद्ध हवेसाठी संघर्ष करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. वाढदिवस, सण किंवा इतर शुभप्रसंगी ‘एक झाड लावा आणि ते जगवा’ हा संदेशही दिला जात आहे.

नंदू वारुंगळे (सरपंच, तोंडोळी)
आपले गाव हे आपले घर आहे. जर आज आपण ही वृक्षतोड थांबवली नाही आणि नवीन झाडे लावली नाहीत, तर उद्या आपल्या पुढच्या पिढीला पाण्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी वणवण भटकावे लागेल. गावातील तरुण पिढीने आतातातडीने पुढे येऊन वृक्षारोपण आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे.

एकंदर, तोंडोळी परिसरात वाढती वृक्षतोड आणि त्यातून निर्माण होणारे संकट लक्षात घेता प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. अन्यथा येणाऱ्या काळात या भागाला भीषण पर्यावरणीय परिणामांना सामोरे जावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!