Homeताज्या बातम्याIndapur NCP Pradip garatkar: 'पक्षाने आम्हाला कोललं, तर...'; अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा...

Indapur NCP Pradip garatkar: ‘पक्षाने आम्हाला कोललं, तर…’; अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा थेट दादांना इशारा

Times of Maharashtra Desk, Pune : इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठा अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इंदापूरचे आमदार व कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना गर्भित इशारा दिल्यामुळे पुण्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

वाद नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून

इंदापूर नगरपरिषदेच्या आगामी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यायची, यावरून हा पेच निर्माण झाला आहे. माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन घड्याळ चिन्हावर उमेदवारी देण्याच्या प्रयत्नांना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आणि त्यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. या उमेदवारीवरून इंदापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता दोन गट पडले आहेत.

गारटकरांचा थेट इशारा

बुधवारी पुण्यात अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत या वादावर चर्चा झाली. मात्र सायंकाळी इंदापूरमध्ये आपल्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत गारटकर यांनी आपली रोखठोक भूमिका ठामपणे मांडली. पक्षाने आमच्या समर्थकांच्या भावना मान्य केल्या नाहीत आणि सन्मान दिला नाही तर आपण कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पक्ष नेतृत्वाने आमचे म्हणणे ऐकले आणि योग्य सन्मान ठेवला तर आम्ही घड्याळ चिन्हावरच राहू. पण जर पक्षाने आम्हाला कोललं तर आम्हीसुद्धा पक्षाला कोलल्याशिवाय राहणार नाही. अन्याय सहन न करता मी नैतिकतेच्या आधारावर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देईन आणि स्वतंत्र आघाडी उभी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू असे त्यांनी सांगितले.

गारटकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत पक्षाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गारटकर गटाच्या या थेट पवित्र्यामुळे इंदापूरचे राजकारण तापले असून, हा वाद उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे प्रशासनरत्न पुरस्काराने सन्मानीत

0
म्हसवड-माण (प्रतिनिधी महेश कांबळे) : तालुक्यातील म्हसवड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशन सांगली (तासगांव) यांच्यावतीने राज्यस्तरीय प्रशासनरत्न पुरस्कार...

दौंडमध्ये भीम महोत्सवात ४२ रक्तदात्यांचे रक्तदान; आंबेडकर-फुले जयंतीनिमित्त मानवंदना

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) :  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त दौंड येथे  भीम महोत्सव २०२६ ...

पुण्याच्या डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांची ISAR च्या 16व्या अध्यक्षपदी नियुक्ती; भारतातील फलनक्षमता उपचार क्षेत्राला...

0
Times Of Maharashtra Desk : आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त फलनक्षमता तज्ज्ञ आणि रुबी हॉल आयव्हीएफ एंडोस्कोपी सेंटरच्या प्रमुख डॉ. सुनिता तांडुळवाडकर यांनी आता इंडियन...

सिंहगड रोड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दहशत माजवण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

0
Times Of Maharashtra Desk पुणे : सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने एका २७ वर्षीय तरुणाला अटक करून त्याच्याकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत....

संतोष भंडारी , केशव पंडितांच्या अटकेसाठी

0
गेवराई तालुका (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) :  ठेवीदार कलेक्टर व एसपी कार्यालयात धडकले गेवराई, दि.१८(प्रतिनिधी )_ १६ एप्रिल रोजी गेवराई येथील विविध क्रेडिट सोसायटी व...

error: Content is protected !!