Homeताज्या बातम्याIndiGo airline flight cancellations"इंडिगोच्या FDTL नियमांमुळे 1000 हून अधिक फ्लाइट रद्द; DGCA...

IndiGo airline flight cancellations”इंडिगोच्या FDTL नियमांमुळे 1000 हून अधिक फ्लाइट रद्द; DGCA अंमलबजावणी मागे घेतली”

Times of Maharashtra Desk: देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोच्या बुधवार आणि गुरुवारी मिळून 450 हून अधिक फ्लाइट रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगोचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65% असल्यामुळे, याचा फटका देशभरातील अनेक विमानतळांवर बसला असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.फ्लाइट रद्द झाल्यामुळे दिल्ली, बंगलुरु, हैदराबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रवाशांची हालचाल प्रभावित झाली आहे. या संकटामुळे इतर एअरलाइनसह इंडिगोनंही तिकिटांचे दर वाढवले आहेत. गेल्या चार दिवसांत 1000 हून अधिक फ्लाइट रद्द केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

देशातील प्रमुख एअरलाइन इंडिगोने काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लाइट रद्द केल्याबाबत विविध कारणे मांडली आहेत. कंपनीने सांगितले की रद्द होण्यामागील मुख्य कारणांमध्ये एअरबस A320 च्या सॉफ्टवेअरमध्ये आलेला ग्लिच , हिवाळ्यामुळे वेळापत्रकात बदल, वातावरणीय अडथळे यांचा समावेश आहे.तथापि, हवाई उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, इंडिगोच्या फ्लाइट रद्द होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांची अंमलबजावणी. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर पायलट आणि क्रू मेंबर्सना त्यांच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांची उपलब्धता मर्यादित झाली आणि परिणामी अनेक फ्लाइट रद्द कराव्या लागल्या.

फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. या नियमांमुळे पायलट आणि क्रू मेंबर्सच्या कामाचे आणि विश्रांतीचे तास ठरवले गेले आहेत, ज्यामुळे इंडिगोच्या उड्डाणांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

FDTL नियमांनुसार बदल पुढीलप्रमाणे आहेत:

  • पायलट आणि क्रू मेंबर्सच्या आठवड्याचे सुट्टीचे तास 36 वरून 48 करण्यात आले.
  • नाईट लँडिंग मर्यादा 6 वरून 2 केली गेली.
  • रात्रीच्या उड्डाणाची मर्यादा 8 तास ठेवण्यात आली.
  • नाईट ड्युटी विंडो रात्री 12 ते पहाटे 6 ठरवण्यात आली.

इंडिगोला अपेक्षा होती की नियमांची अंमलबजावणी काही काळानंतर केली जाईल किंवा मुदत वाढवली जाईल, परंतु DGCA ने मुदतवाढ दिली नाही, ज्यामुळे कंपनीच्या उड्डाणांच्या नियोजनात गोंधळ निर्माण झाला आणि काही फ्लाइट रद्द कराव्या लागल्या.

इंडिगो एका दिवसात 2200 फ्लाइट्स चालवते, जे एअर इंडियाच्या दुप्पट आहे. नियोजनातील त्रुटींमुळे फक्त 10% फ्लाइट रद्द झाल्या तरी 200-400 फ्लाइट्स रद्द होतात, ज्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होतो. DGCA ने 1 नोव्हेंबरपासून लागू केलेल्या FDTL नियमांची अंमलबजावणी सध्याच्या परिस्थिती पाहता मागे घेतली. इंडिगोने सांगितले की पुढील 48 तासांत सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली जाईल. इंडिगोची टीम २४ तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!