Homeमहत्त्वाचेपिंपरीत धक्कादायक प्रकार; विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू – सरकारी अहवालात महावितरण दोषी,...

पिंपरीत धक्कादायक प्रकार; विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू – सरकारी अहवालात महावितरण दोषी, तरीही FIR नाही! ग्रामस्थांत संताप उसळला

Times of Maharashtra Desk: गणेश नारंग (पिंपरी चिंचवड प्रतिनिधी)

पिंपरी गावात महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे एका गाईचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरकारी विद्युत निरीक्षकांच्या चौकशीत महावितरणचे संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार दोषी असल्याचे स्पष्टपणे नमूद झाले असूनही, पिंपरी पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवण्यास नकार देत केवळ NCR दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

विद्युत निरीक्षकांनी 30 जून 2025 रोजी जारी केलेल्या अहवालात DP बॉक्सजवळ सैल वायर, सुरक्षा साधनांची कमतरता आणि फिक्स्ड पिलरमधील दोष यामुळेच गाईचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट केले आहे. महावितरणनेही त्यांच्या लेखी पत्रात त्या दिवशी तांत्रिक दोष झाल्याची कबुली दिली आहे.

नवीन Bharatiya Nyaya Sanhita (BNS) 2023 नुसार या प्रकरणात कलम 324(2) (पशुधनाचे नुकसान) आणि कलम 325(2) (जनावरांचा मृत्यू) ही दोन्ही कॉग्निजेबल व गंभीर गुन्ह्यांची कलमे लागू होतात. त्यामुळे FIR दाखल करणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य असतानाही पिंपरी पोलिसांनी ही कलमे टाळून अप्रस्तुत BNSS 211 लावले आहे, ज्यामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा पेट घेत आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी संताप व्यक्त करत सांगितले, “सरकारी अहवाल, पुरावे, महावितरणची कबुली—सर्व कागदपत्रे देऊनही सहा महिने FIR टाळली जात आहे. हे न्याय न देण्याचे आणि प्रकरण दडपण्याचे स्पष्ट उदाहरण आहे.”

ग्रामस्थांनीही पोलिसांच्या भूमिकेवर तिखट प्रतिक्रिया देत FIR नोंदवली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सरकारी अहवालात दोष सिद्ध असून महावितरणनेही जबाबदारी मान्य केलेली असताना FIR नोंद न करणे हे पोलिस प्रशासन व महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!