Homeताज्या बातम्यारक्षकच बनले भक्षक! पुणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या 'वसुली बहाद्दरांची' यादी 'टाईम्स...

रक्षकच बनले भक्षक! पुणे गुन्हे शाखा युनिट-२ च्या ‘वसुली बहाद्दरांची’ यादी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या हाती

कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद मागायची कुणाकडे? अवैध धंद्यांना अभय देणाऱ्या खाकी वर्दीतील ‘हप्तेखोरां’वर पोलीस आयुक्त कारवाई करणार का?

पुणे (विशेष प्रतिनिधी):
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रमुख जबाबदारी ज्या गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खांद्यावर आहे, त्याच गुन्हे शाखेतील काही महाभाग चक्क अवैध धंद्यावाल्यांचे ‘वसुली एजंट’ म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट-२ मधील या ‘वसुली बहाद्दरांची’ नावे आणि त्यांनी वाटून घेतलेले त्यांचे ‘इलाके’ यांची संपूर्ण यादीच आता ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’च्या हाती लागली आहे.

अशी चालते ‘अर्थ’पूर्ण विभागणी…
‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार, युनिट-२ मध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आपली वसुलीची ‘जबाबदारी’ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाटून घेतली आहे. याची धक्कादायक यादी खालीलप्रमाणे:
स्वारगेट पोलीस स्टेशन: या गजबजलेल्या परिसरातील वसुलीची बहाद्दर शंकर नेवसे यांच्यावर आहे.

मार्केट यार्ड पोलीस स्टेशन: येथील अवैध धंद्यांची ‘काळजी’ घेण्याचे काम नागेश राख करत आहेत.
बिबवेवाडी पोलीस स्टेशन: या परिसरातील वसुलीचा कार्यभार मांढरे योगेश हे सांभाळत आहेत.

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे: विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असलेल्या या हद्दीची वसुली ‘पवार’ नामक व्यक्ती करत आहे.
आंबेगाव पोलीस स्टेशन: या भागातील वसुलीची सूत्रे उज्वल आबा मोकाशी यांच्या हाती आहेत.
सहकारनगर पोलीस स्टेशन: या उच्चभ्रू वस्तीत शंकर कुंभार हे वसुलीचे काम पाहत आहेत.
पर्वती पोलीस स्टेशन: या हद्दीत संदीप शिर्के हे अवैध धंद्यावाल्यांकडून हप्ते गोळा करत आहेत.

कायद्याचा धाक उरलाय कुठे?
हे सर्व जण साधेसुधे नागरिक नसून पुणे पोलीस दलातील कर्मचारी आहेत आणि विशेष म्हणजे ते गुन्हे शाखा युनिट-२ मध्ये कार्यरत आहेत. ज्यांच्यावर अवैध धंद्यांवर धाडी टाकून ते उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आहे, तेच जर अशा प्रकारे हप्ते घेऊन या धंद्यांना पाठराखण करत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? असा संतप्त आणि मार्मिक प्रश्न आता उपस्थित होत आहे. गुन्हे शाखेच्या नाकाखालीच जर हा सावळागोंधळ राजरोसपणे सुरू असेल, तर शहरात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, यावरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
पुणे पोलिसांच्या प्रतिमेला थेट काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. आता या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल घेत पुणे पोलीस आयुक्त या ‘खाकी वर्दीतील वसुली गँग’वर नेमकी काय आणि किती कठोर कारवाई करणार? की केवळ थातूरमातूर चौकशीचा फार्स करून या प्रकरणावर पडदा टाकण्यात येणार? याकडे ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र’ आणि तमाम पुणेकरांचे बारीक लक्ष लागून राहील.

भाग 1

क्रमश:

लवकरच भाग दोन मध्ये अवैध धंद्यांचे ठिकाण आणि अवैध व्यवसाय चालकाचे नावांची यादी करणार जाहीर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महावितरण विद्युत सुरक्षा सप्ताह स्पर्धेत वाजे विद्यालयाचे घवघवीत यश

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): महावितरणच्या विद्युत सुरक्षा सप्ताह २०२६ जनजागृती अभियानांतर्गत आयोजित निबंध व चित्रकला स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाचे लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे...

आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट? अविनाश रेवे या पोलीस कर्मचाऱ्यावर पाठराखणीचे गंभीर...

0
स्थानिक नागरिकांकडून कारवाईची मागणी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी अपेक्षा. पुणे : आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर ऊत आल्याचा...

महात्मा जोतिबा फुले हायस्कूलमध्ये लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शूज वाटप

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) :  महात्मा जोतिबा फुले हायस्कूल, शिरपूर येथे लीनेस क्लब, शिरपूर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शालेय शूज वाटपाचा समाजोपयोगी उपक्रम उत्साहात...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण अभियानाला अधिक वेग ; ७ ते १० जुलैदरम्यान ग्रामपंचायत स्तरावर विशेष...

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : प्रत्येक पात्र मतदाराने गणना प्रपत्र भरून देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आवाहन भारत...

खडकवासला धरण अपडेट : मुसळधार पावसानंतर पाणीसाठ्यात मोठी वाढ; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

0
पुणे | ७ जुलै २०२६: पुणे जिल्ह्यासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळपर्यंत...

error: Content is protected !!