Homeमहाराष्ट्रमहाराजस्व समाधान शिबिरा'तून शासनाचा लाभ थेट जनतेच्या दारी !

महाराजस्व समाधान शिबिरा’तून शासनाचा लाभ थेट जनतेच्या दारी !

रुपेश देशमुख ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी) : 

मेंडकी येथे महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतमजूर, शेतकरी बांधव, आणि विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी स्तरावर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” आयोजित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतेलेला आहे.

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राजे म्हणून प्रत्येक घटकाला स्वतंत्र, सुरक्षित न्याय दिले. शिवाजी महाराजांनी

शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास करमाफी,शेतकऱ्यांच्या पिकांच्या देठालाही हात लावू नये।

स्त्रियांचा सन्मान शेतकरी,सामान्य नागरिकांसाठी सन्मान न्याय, शेतीसाठी सवलती इत्यादी सोई सुविधा दिल्या होत्या.

त्याचाच एक भाग म्हणून दिनांक १४/३/२०२६ रोजी महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या अभियानाचा शुभारंभ नुकताच मेंडकी येथे प्रांत अधिकारी पर्वणी पाटील, यांच्या उपस्थित करण्यात आला.

यावेळी तहसीलदार सतीश मासाळ, नायब तहसीलदार लीना बोबाटे, नायब तहसीलदार महानंदा मडावी, नायब तहसीलदार प्रशांत धकाते, निरीक्षक अधिकारी अमित कांबळे, उप अधिक्षक भूमी अभिलेख गोरखा, दुय्यम निबंधक जयंत मडावी, तसेच मेंडकीचे सरपंच आदी उपस्थित होते. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे, प्रांत अधिकारी पर्वणी पाटील सांगितले की सर्व नागरिकांनी लोकोपयोगी योजनांचा लाभ घ्यावा. शासकीय लाभापासून कोणीही वंचित राहू नये. तसेच आपल्या महसूल विषयक अडीअडचणी सोडवण्यासाठी नागरिकांनी त्वरीत निराकरण करून घ्यावे. कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते १८० लाभार्थ्यांना विवीध प्रमाणपत्र व दाखल्याचे वाटप करण्यात आले. आणि सोबतच नेत्र शिबिरामध्ये १०९ लाभार्थ्यांनी नेत्र तपासून घेतले यावेळी प्रांत अधिकारी पर्वणी पाटील

आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या शंकांचे निराकरण केले. अभियानात जवळपास ४०० ते ५०० नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

समाधान लॉजवर पोलिसांचा छापा; अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

0
दौंड( प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) दि. ३० जुलै : दौंड तालुक्यातील मौजे गिरीम येथील वायरलेस फाटा, दौंड–पाटस रोडलगत असलेल्या 'समाधान लॉज' येथे दौंड पोलिसांनी...

शिरपूर तालुक्यातील आदर्श गाव अंतर्गत राज्याचे माजी सचिव जयंत भाटिया यांची जातोडा येथे भेट

0
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर विधान परिषद मतदार संघाचे आमदार मा. अमरीश भाई पटेल व शिरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष मा. भूपेश भाई...

शारदा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिणींच्या शुभहस्ते शुभारंभ

0
बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे जयसिंग पंडित यांचे आवाहन गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) गेवराई, दि.३० (प्रतिनिधी) जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने गेवराई शहरात १०० खाटांचे अत्याधुनिक आरोग्य सुविधांसह...

एक कॉल, आणि तात्काळ सेवा; ब्रह्मपुरी पोलिसांचे ‘डायल ११२’चे आवाहन.

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी वाढती गुन्हेगारी, अपघातांचे प्रमाण आणि ऐनवेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अधिक हायटेक झाले आहे. नागरिकांना कोणत्याही संकटसमयी...

गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बोराडी येथे कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्राचे जल्लोषात उद्घाटन

0
 शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी  तुषार शेटे) गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वाचे औचित्य साधत किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर भरतीपूर्व सैनिकी प्रशिक्षण केंद्र, बोराडी शाखेचे उद्घाटन उत्साहपूर्ण...

error: Content is protected !!