Homeताज्या बातम्यारोहित पवारांची 'संघर्ष यात्रा' परत सुरु होणार; हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोहोचणार नागपुरात...

रोहित पवारांची ‘संघर्ष यात्रा’ परत सुरु होणार; हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोहोचणार नागपुरात…

रोहित पवारांची ‘संघर्ष यात्रा’ 
परत सुरु होणार; हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर पोहोचणार नागपुरात

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांची स्थगित झालेली संघर्ष यात्रा

आता दिवाळीनंतर पुन्हा सुरु होणार आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनामुळे रोहित पवार यांनी संघर्ष यात्रा स्थगित केली होती.

राज्यातील युवावर्गाला भेडसावणारे नेमके प्रश्न घेऊन रोहित पवार यांची संघर्ष यात्रा राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर नागपूरला पोहोचणार आहे. यंदाची दिवाळी रोहित पवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत तसेच नांदेड येथील दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्यासह साजरी करणार आहेत. रोहित पवार यांची संघर्ष यात्रा ही ८०० किलोमीटरची असणार आहे. त्यात रोज दिवसाला १७ ते १८ किलोमीटरचा प्रवास असेल.

पहिला टप्पा ११ किलोमीटरचा असेल. हा टप्पा पूर्ण झाला की, कोरोगावला थांबा असेल. त्यानंतर संध्याकाळी शेवटचा सात किलोमीटरचा टप्पा पार करणार आहेत. प्रत्येक दिवसाची यात्रा ही दोन टप्प्यात असणार आहे. एकूण ४५ दिवसांचा प्रवास असून पुण्यातील तुळापूर येथून या संघर्ष यात्रेला सुरुवात होईल. त्यानंतर काष्टी, कर्जत, पाटोदा, बीड, जातेगाव, पिंपळगाव, कुंभार, परतुर, जिंतूर, सेनगाव, वनोजा, वाशिम, कारंजा, पापळ, पुलगाव, सेवाग्राम, बाजार गाव आणि नागपूर येथे या युवा संघर्ष यात्रेचा समारोप ७ डिसेंबर रोजी होणार आहे.

यासंदर्भात रोहित पवार म्हणाले की, या संघर्ष यात्रेदरम्यान अनेक गावांमध्ये थांबा असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील प्रश्न आणि नागरिकांच्या समस्यादेखील यातून पुढे येणार आहे. त्यामुळे त्यावरदेखील भविष्यात काम करण्याचे नियोजन करणार आहे. तसेच, सगळ्या महाराष्ट्रात अनेक गावं आहेत आणि या प्रत्येक गावातील नागरिकांच्या वेगळ्या समस्या आहे. त्या समस्या जाणून घेणारं कोणी नाही. त्यांच्यासाठी मी असणार आहे. त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हा पोलीस दलात ‘नो हेल्मेट, नो एन्ट्री’ नियम लागू; एसपी श्रीकांत धिवरे यांचा सुरक्षा...

0
विनोद पवार | जळगाव प्रतिनिधी जळगाव : रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या वाढत्या मृत्यूच्या घटना लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस दलात...

विंचूर जवळ भीषण अपघात; छोटा हत्ती चालकाचा जागीच मृत्यू, कांदा मालक शेतकरी गंभीर जखमी

0
एकेरी वाहतुकीमुळे विंचूर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले; नागरिकांकडून तातडीने उपाययोजनांची मागणी निफाड तालुक्यातील विंचूर जवळ आज गुरुवार, दि.३० दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण...

संततधारेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी सुखावला.

0
 देऊळगाव राजा तालुका (प्रतिनिधी बबनराव नागरे) देऊळगाव राजा तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते.दमदार पाऊस न पडल्याने पावसाची चातकाप्रमाणे शेतकरी वाट बघत...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे – साहित्य , शाहिरी आणि सामाजिक समतेचा अखंड लढा

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक , साहित्यिक आणि सामाजिक इतिहासात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे . समाजातील उपेक्षित ,...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते आणि राष्ट्रचेतनेचे जागृत शिल्पकार

0
विष्णु गायकवाड गेवराई तालुका प्रतिनीधी: " स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच . " या एका घोषणेने लाखो भारतीयांच्या मनामध्ये...

error: Content is protected !!