Homeताज्या बातम्यापुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली शरद पवारांचा विधान...

पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली शरद पवारांचा विधान…

पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली शरद पवारांचा विधान…

पुणे : शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जी जबाबदारी आहे ती पाळली, त्यामुळे उगीच याला वेगळं स्वरूप द्यायची आवश्यकता नाही असं सांगत शरद पवारांनी पुणे अपघात प्रकरणी राजकारण करणाऱ्यांना फटकारलं आहे.

पोर्शे अपघातात २ जणांचा मृत्यू झाला त्यानंतर या घटनेतील अल्पवयीन आरोपीला किरकोळ अटींवर जामीन देण्यात आला. त्यामुळे सोशल मिडियासह विरोधकांनी यावर संताप व्यक्त केला. त्यानंतर तातडीने या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तालय गाठत प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तपास यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या. या काळात आरोपीच्या वकिलांचे शरद पवारांशी संबंध असल्याचा फोटो व्हायरल झाला त्यावर पवारांनी उत्तर दिले. 

शरद पवार म्हणाले की, एखाद्या पेपरनं वकिलासोबत माझा फोटो छापला म्हणून माझा अपघाताशी संबंध कसा काय जोडता? प्रत्येक गोष्टीवर मी भाष्य करणं गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी असते ती पार पाडलेली दिसते त्यामुळे उगीच याला वेगळं स्वरुप देण्याची आवश्यकता नाही असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. एकंदरीत शरद पवारांच्या या विधानामुळे पुणे अपघातावर राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाच फटकारल्याचं दिसून येते. 

देवेद्र फडणवीसांचा पुढाकार, तपास यंत्रणाने वेगाने चक्र फिरवली

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरण चर्चेत येताच उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे गाठले. त्याठिकाणी अपघाताबाबत माहिती घेत तात्काळ पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात वेगाने चक्र फिरवत आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. या अपघाताच्या निमित्ताने विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीसांनी पुढाकार घेत पुणे पोलिसांना जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अपघात प्रकरणी आतापर्यंत आरोपीचे आजोबा आणि वडिलांसह ७ जणांना अटक करण्यात आली आहे. हे ५ लोक दोन पबचे मालक, व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत. अल्पवयीन आरोपींना दारू पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!