Homeताज्या बातम्याकोंढव्यात सामाजिक कार्यकर्ते शोएब खान यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी संपन्न; हिंदू-मुस्लिम...

कोंढव्यात सामाजिक कार्यकर्ते शोएब खान यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दिले यामाध्यमातून संदेश…

कोंढव्यात सामाजिक कार्यकर्ते शोएब खान यांच्या वतीने आयोजित इफ्तार पार्टी संपन्न; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दिले यामाध्यमातून संदेश…
पुणे :- सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र असलेला रमजान महिना सुरू आहे. यातच अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहेत. त्यातच कोंढव्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष शोएब खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने कोंढव्यात रविवारी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीमध्ये हिंदू आणि मुस्लिम समुदायातील नागरिकांनी एकत्रितपणे इफ्तार करून बंधुभावाचे दर्शन घडवले.
इफ्तार पार्टीमध्ये विविध प्रकारचे स्वादिष्ट इफ्तार पदार्थ, मुलांसाठी मनोरंजक खेळ आणि कार्यक्रम, प्रसिद्ध धार्मिक विद्वानांचे प्रवचन (बयान) आणि गरजू लोकांसाठी मदत वाटप यांचा समावेश होता.
दरवर्षी शोएब खान इफ्तार पार्टीचे आयोजन करत असतात.

तसेच यावेळी कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे
 यांनी सांगितले की, या कार्यक्रमाद्वारे सामाजिक बंधुभाव आणि समन्वय वाढण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच सामाजिक बांधिलकीही वाढेल असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी शोएब खान यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. सातत्याने काहीना काही समाज उपयोगी कार्यक्रम शोएब खान करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी सांगितले की, असे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल त्यांनी शोएब खान यांचे अभिनंदन केले. युवकांनी असे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार घ्यावा असाही त्यांनी या माध्यमातून युवकांना संदेश दिला.
यावेळी शोएब खान यांनी बोलताना म्हटले की, ही इफ्तार पार्टी हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. आपण सर्वांनी बंधुभाव आणि समन्वय यांच्या भावनांनी एकत्रितपणे जीवन जगणे गरजेचे आहे. आम्ही सर्वांना अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन सामाजिक एकता मजबूत करण्याचे आवाहन करतो.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेवक रईस सुंडके, काँग्रेसचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, नवनीत गांधी, देविदास लोणकर, छबिल पटेल, फैय्याज शेख, नूर शेख, सिकंदर सय्यद व आदी उपस्थित होते.
या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमासाठी सुरक्षा व्यवस्थाही चांगली होती.
या कार्यक्रमाचे सर्वस्वी आयोजन समता युवा मंचाचे वतीने करण्यात आले होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जकार्तात मोदींचे भव्य स्वागत; इंडो-पॅसिफिक दौऱ्याची दमदार सुरुवात व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि महत्त्वपूर्ण खनिजांवर...

0
जकार्ता | वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील तीन देशांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियातून केली. जकार्ता येथे पोहोचताच इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांनी...

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कामाकडे दुर्लक्ष; 70 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना नोटिसा

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दि. 6 जुलै : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम शिरपूर तालुक्यात...

राज्य उत्पादन शुल्क विभागातील बदल्यांवर संशयाचे सावट; मेडिकल ग्राउंड आणि ‘DPC’वरून खळबळ

0
मुंबई (प्रतिनिधी विशेष ): राज्य उत्पादन शुल्क विभागातील यंदाची बदली प्रक्रिया पारदर्शकतेऐवजी संशयाच्या भोवऱ्यात अडकली असून, मेडिकल ग्राउंडचा आधार घेत सोयीच्या ठिकाणी बदली करून...

सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान ५ वर्षीय बालकाचा मृत्यू; पालकांकडून वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप, चौकशीची मागणी

0
सिरोंचा तालुका:(प्रतिनिधी जाबिर खान)सिरोंचा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या पाच वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेनंतर पालकांनी वैद्यकीय...

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेला वेग ; प्रशासनाच्या समन्वित प्रयत्नांमुळे विशेष पुनरीक्षण अभियान प्रभावीपणे सुरू

0
गेवराई तालुका:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण ( एस . आय . आर . ) २०२६ अभियानाला बीड जिल्ह्यात...

error: Content is protected !!