Homeताज्या बातम्यासिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

सिरोंचा पोलीस उपविभागाकडून गरजू युवतीस विवाहासाठी आर्थिक मदत

गडचिरोली (प्रतिनिधि जाबिर खान): गडचिरोली जिल्हा पोलीस दलामार्फत श्री.एम. रमेश पोलीस अधीक्षक गडचिरोली, श्री.कार्तिक मधिरा मा.अपर पोलीस अधीक्षक (अभियान)तसेच श्री गोकुल राजजी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) यांच्या मार्गदर्शनाखाली “पोलीस दादा लोरा खिडकी” या उपक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक व लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. समाजातील गरजू, वंचित व दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याच्या या प्रेरणादायी उपक्रमातूनच सिरोंचा पोलीस उपविभागानेही एक सामाजिक बांधिलकी जपत मदतीचे कार्य हाती घेतले.

सिरोंचा तालुक्यातील माणिक्यपूर येथील रहिवासी कु. श्रेया मचेंदर कुमरी (वय 21 वर्षे) हिच्या विवाहासाठी व पुढील संसार उभारणीसाठी सिरोंचा पोलीस उपविभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी स्वखुशीने आर्थिक मदत संकलित केली.

कु. श्रेया हिची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून तिच्या आई-वडिलांनी परस्पर दुसरे विवाह केल्यानंतर तिचा सांभाळ करणारे कोणीही नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत तिच्या सुमारे 75

वर्षीय आजीने स्वतः रोजमजुरी करून तिचे पालनपोषण केले. अत्यंत कष्टमय जीवन जगत आजीनेच श्रेयाला लहानाचे मोठे केले, तिचे संगोपन केले आणि तिच्या आयुष्याला आधार दिला. सदर बाब समोर आल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवत तिच्या lमदतीसाठी पुढाकार घेतला.
यामध्ये सिरोंचा उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान दिले.

संकलित करण्यात आलेली मदत रक्कम दिनांक 23/05/2026 रोजी श्री हर्षवर्धन अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यांच्या हस्ते कु. श्रेया मचेंदर कुमरी हिला तिच्या विवाह कार्याकरिता तसेच भावी संसारासाठी प्रदान करण्यात आली.

यावेळी माननीय अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सामाजिक जाणीव, मानवतावादी दृष्टिकोन व माणुसकीच्या भावनेचे विशेष कौतुक केले. ही केवळ आर्थिक मदत नसून समाजातील गरजू व वंचित घटकांप्रती असलेली संवेदनशीलता, सामाजिक उत्तरदायित्व आणि पोलीस दलाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

सदर उपक्रमातून पोलीस दलाचे समाजाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ झाले असून, गरजू नागरिकांच्या मदतीसाठी भविष्यातही अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
– पोलीस विभाग, सिरोंचा उपविभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गुलाब पुष्पांनी मा. तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला अभिषेक; तीन वर्षे FDA मधून बदली करू...

0
  निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव) पिंपळगाव बसवंत, दि. ११ जुलै : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज सकाळी १०:०० वाजता संविधान चौक, पिंपळगाव बसवंत येथे मा. तुकाराम...

अल्पसंख्याक मोर्चाच्या बळकटीकरणासाठी सरफराज आलम सक्रिय; राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची घेतली सदिच्छा भेट

0
प्रतिनिधी:(जाबिर खान) भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्या नुकत्याच झालेल्या गडचिरोली जिल्हा दौऱ्यादरम्यान भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सरफराज आलम...

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर येथे जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्य सखी यांच्यातर्फे गरजू विद्यार्थ्यांना...

0
शिरपूर:(प्रतिनिधी तुषार शेटे) दिनांक :09/07/2026 रोजी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयत जायन्टस ग्रुप ऑफ लक्ष्यसखी यांच्या तर्फे गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सर्वप्रथम महात्मा...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी बाबत जाहिर आवाहन

0
शिरपूर:(​प्रतिनिधी तुषार शेटे)भारत निवडणूक आयोग यांचे आदेशानुसार शिरपूर विधानसभा मतदार संघात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे त्यासाठी शिरपूर विधानसभा मतदार संघातील...

महसूल खात्यात भ्रष्टाचाराचे जाळे? जनतेच्या विश्वासावर घाला; आता सर्वंकष चौकशीची वेळ!

0
  निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज राज्यातील सर्वसामान्य नागरिकाचा महसूल विभागाशी सर्वाधिक संबंध येतो. जमिनीची खरेदी-विक्री, सातबारा उतारा, फेरफार, वारस नोंद, मोजणी, सीमांकन,...

error: Content is protected !!