Homeक्राईमवडुजमध्ये धक्कादायक घटना; विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांविरोधात गुन्हा

वडुजमध्ये धक्कादायक घटना; विवाहितेची आत्महत्या, पतीसह तिघांविरोधात गुन्हा

धनंजय कावडे (शिखर शिंगणापूर प्रतिनिधी ) : वडुज शहरात घरगुती छळाच्या पार्श्वभूमीवर एका विवाहित महिलेने टोकाचा निर्णय घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मौजे वडुज, तालुका खटाव येथील शांताई पार्क परिसरातील विती अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी वडुज पोलीस ठाणे येथे पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

मृत महिला मेघा विनायक पवार यांना पती विनायक पवार, दिर विजय उर्फ बंडा पवार आणि सासरे नंदकुमार पवार यांच्याकडून वारंवार मारहाण, शिवीगाळ, मानसिक छळ तसेच जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या सातत्यपूर्ण शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून मेघा पवार यांनी राहत्या घरातील स्वयंपाकघरात साडीच्या सहाय्याने लोखंडी हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे वडुज शहरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पवार कुटुंबात यापूर्वीही मेघा पवार यांची जाऊ पायल विजय पवार आणि सासू मंदाकिनी पवार यांनीही आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्या घटनांचीही माहिती पडताळली जात असल्याचे समजते.

घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून संबंधितांची चौकशी करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक! राज्यातील एका महत्त्वाच्या पोलीस मुख्यालयात ३ महिला पोलिसांना रायफल आणि बांबूने...

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती लागले भयंकर पुरावे!बड्या अधिकाऱ्यांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): कायद्याचे रक्षण करणाऱ्या आणि महिलांच्या सुरक्षेच्या आणाभाका घेणाऱ्या पोलीस दलाला...

सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टच्या निषेधार्थ सिन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ अवघड)  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत सोशल मीडियावर कथित आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी सिन्नर येथील छत्रपती शिवाजी...

१४ मोकाट जनावरे ताब्यात, हळदा गोशाळेत रवानगी

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी: शहरातील मुख्य रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता ब्रह्मपुरी नगर परिषदेने...

एमआयडीसीतील बाबा नमकीन चिवडा कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज

0
जळगाव:(प्रतिनिधी(विनोद पवार) जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील बाबा नमकीन चिवडा या खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपनीला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली....

महाराष्ट्र शासनाच्या CCMP नोंदणी निर्णयाच्या पाश्वभूमीवर IMA च्या बंददरम्मान आयुष डॉक्टरांकडून अखंड आरोग्यसेवेची हमी

0
गेवराई तालुका प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी होमिओपॅथिक CCMP अहर्ताधारक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (MMC), मुंबई येथे स्वतंत्र नोंदणी देण्याबाबत...

error: Content is protected !!