Homeताज्या बातम्याअबबब... थाळी संपवा आणि बुलेट घेऊन जा...

अबबब… थाळी संपवा आणि बुलेट घेऊन जा…

अबबब… थाळी संपवा आणि बुलेट घेऊन जा…
पुणे :- कोरोना विषाणुमुळे देशातील सर्व व्यवसाय पुर्णपणे ठप्प झालेत. याचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल व्यवसायाला बसला. परंतु संसर्ग आटोक्यात येत असल्याने अनेक नियमांसह हॉटेल्स व्यवसाय पुन्हा सुरु झालेत. पण कोरोनाच्या भितीने ग्राहक हॉटेलकडे यायला तयार नाहीत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना नफ्यापेक्षा तोटाच अधिक सहन करावा लागत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल मालकांनी नवनवे फंडे वापरण्यास सुरु केली आहे.
पुण्यातील शिवराज हॉटेल मालकाने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चक्क रॉयल एनफिल्ड बुलेट देण्याचे घोषित केले आहे. परंतु ही बुलेट मिळवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांना खास अटी व शर्ती दिल्या आहेत. परंतु तरुणांची शान आणि जान असलेली बुलेट जिंकण्यासाठी ग्राहकांना या हॉटेलची खास नॉन व्हेज थाळी ६० मिनिटात संपवावी लागणार आहे. या थाळीमध्ये जवळपास १२ पदार्थ आहेत. ज्यात ४ किलो मटण, फ्राय मच्छी, फ्राय सुरमई, पापलेट, चिकन तंदूरी, ड्राय मटण, ग्रे मटण, चिकन मसाला, कोळंबी व बिर्याणी यांसारखे पदार्थ आहेत. दरम्यान एकाच व्यक्तीला ही थाळी संपवायची आहे. जर ही थाळी ६० मिनिटात संपली तर ग्राहकांना 1 लाख 65 हजारांची बुलेट जिंकता येणार आहे. या हॉटेलमधील एकूण 55 कर्मचाऱ्यांनी मिळून ही खास थाळी तयार केली आहे.
पुण्यातील वडगाव मावळ भागात हे हॉटेल असून हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांनी ही हटके, भन्नाट योजना सुरु केली आहे. शिवराज हॉटेलनं यापूर्वीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 60 मिनिटांमध्ये ‘रावण थाळी’ खाण्याची जरा योजना केली होती. 8 किलोची ही थाळी चार ग्राहकांनी एकत्रित 60 मिनिटांमध्ये संपवल्यास त्यांना 5 हजार रुपये बक्षिस आणि शिवाय त्या थाळीचं बिल माफ अशी ती योजना होती.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!