Homeमहाराष्ट्रगेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

गेवराईचे पत्रकार विष्णू गायकवाड यांना ‘महाराष्ट्र नायक’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

बीड (प्रतिनिधी विशेष) :

बीड जिल्ह्यासाठी आणि गेवराई तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. समाजातील विविध प्रश्नांवर आपल्या प्रभावी लेखणीतून आवाज उठवणारे ‘लोकमत’चे धडाडीचे पत्रकार विष्णू खेमाजी गायकवाड यांना पत्रकारितेतील उत्कृष्ट कार्याबद्दल मानाचा ‘महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले असून, अमरावती येथील समाज प्रतिबिंब बहुद्देशीय संस्था, बी.एस.एफ. बहुद्देशीय संस्था, बुलढाण्यातील सत कबीर बहुद्देशीय संस्था आणि ‘उपेक्षित नायक न्यूज’ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमात पत्रकारितेसह सामाजिक, कृषी, क्रीडा, उद्योग, शिक्षण, प्रशासन आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील तब्बल ७० मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.

मुख्य आयोजक भूषण सरदार यांच्या माहितीनुसार, हा भव्य पुरस्कार सोहळा रविवार, ३१ मे रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे.

विष्णू गायकवाड यांना हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यासह पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, पत्रकार बबनराव नागरे व नंदकिशोर देशमुख...

0
देऊळगाव राजा:(प्रतिनिधी बबनराव नागरे) शासकीय विश्रामगृह देऊळगाव राजा येथे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष मुशीर खान कोटकर, ज्येष्ठ पत्रकार भगवान नागरे आणि पत्रकार नंदकिशोर...

सिन्नर एमआयडीसी मारहाण प्रकरणी तिघांना सहा महिन्यांचा सक्त कारावास; प्रत्येकी ₹२,५०० दंड

0
सिन्नर:( प्रतिनिधी नवनाथ आव्हाड )सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये दाखल झालेल्या मारहाण व धमकी प्रकरणात माननीय जेएमएफसी न्यायालय, सिन्नर यांनी तिघा आरोपींना दोषी...

तांड्याला शिक्षणाची दिशा देणारा दूरदर्शी शिक्षणपुरुष हरपला…

0
डॉ. प्रदीप राठोड प्राचार्य राजाराम राठोड : वंचितांच्या आयुष्यात ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या दूरदर्शी शिक्षणपुरुषाला भावपूर्ण श्रद्धांजली ! छत्रपती संभाजीनगर येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक व...

आरोग्य विकून विकास नको! ब्रह्मपुरीजवळील इथेनॉल प्रकल्पांमुळे ७ गावे संकटात!

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)"विकास हवा, पण आमच्या आरोग्याच्या आणि भविष्याच्या किमतीवर नको!" अशी आर्त हाक आता ग्रामीण भागातून ऐकू येत आहे. परिसरातील नव्याने सुरू झालेल्या इथेनॉल...

दौंडचा समावेश बारामतीच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात करू नका – गटनेते योगेश कटारिया

0
दौंड:(प्रतिनिधी मयूर साळवे,संघराज गायकवाड)राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर दौंड तालुक्याचा समावेश बारामती कार्यालयाऐवजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशीच कायम ठेवावा, अशी ठाम...

error: Content is protected !!